Type Here to Get Search Results !

सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन रा.स्व.संघ जनकल्याण समिती मार्फत रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांचे योगदान


सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन रा.स्व.संघ जनकल्याण समिती मार्फत रक्तदान शिबिरात ५४ रक्तदात्यांचे योगदान


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


सुवर्णमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधुन रा.स्व.संघ जनकल्याण समिती,रोहा यांच्या मार्फत रक्तदान शिबीर संपन्न झाले. ५४रक्तदात्यानी रक्तदानकरून रोहा तालुक्यातील तिसर्‍या कार्यक्रमाचे पुष्प सफल झाले.महाड येथील चितळे प्रतिष्ठानची जनकल्याण रक्त पेढी यांच्या सहकार्याने आयोजीत केलेले हे रक्तदान शिबीर रोह्यातील श्रीराम मंदिरात सकाळी १० ते ४ या वेळेत झाले. श्रीराम व भारत माता प्रतिमापुजन,प्रास्ताविक आणि उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन रक्तदान कार्यक्रमाची सुरुवात झाली.श्री राम मंदिर ट्रस्ट चे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी स्वागताच्यावेळी उपस्थिती दर्शविली. जनकल्याण रक्तपेढीचे रविकांत शिंदे (पब्लिक रिलेशन आॅफिसर) आणि त्यांचे इतर आठ सहकारी या शिबिरात कार्यरत होते. यांच्या बरोबरच रोह्याच्या 'दिपक फाउंडेशन' च्या तरुण उत्साही डॉक्टर सौ.दिघे या पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी म्हणुन उपस्थित होत्या. स्मृती प्रतिष्ठान,मावळा प्रतिष्ठान,राजमुद्रा फाउंडेशन,अभंग सेवा मंडळ,वंदे मातरम ढोल पथक,स्वराज्य प्रतिष्ठान,सृष्टि फाउंडेशन,त्वष्टा कासार समाज मंडळ या रोह्यातील समाजसेवी संघटनां तील स्वयंसेवकांनी रक्तदानात भाग घेतला होता.या शिबीरात प्रथमच रक्तदान करणारी तरुण- तरुणी होती त्याचप्रमाणे, गेली चाळीस वर्षे सतत रक्तदान करत असलेले, आणिआत्तापर्यंत अडतीस वेळा रक्तदान केलेले नागरिकही होते. रणरणत्या उन्हामुळे होणारा त्रास सहन करुनही या शिबिरात ५४ रक्तदात्यांनी उपस्थिती लावुन रक्तदान केले आणि शिबीर यशस्वी होण्यास मदत केली. शेवटी हितेच्छु सहाय्यीभूत झालेल्या संस्था,मान्यवरांचे आभार मानुन कार्यक्रमाचा समारोप झाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test