Type Here to Get Search Results !

लोकांसमोर फोकांड्या न मारता प्रामाणिकपणे विकासकामे करणे हेच ध्येय - आमदार रविंद्र पाटील


लोकांसमोर फोकांड्या न मारता प्रामाणिकपणे विकासकामे करणे हेच ध्येय - आमदार रविंद्र पाटील 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 नागोठणे विभागावर माझे पूर्वीपासूनच प्रेम राहिले आहे. याचबरोबर २००४ साली मी जेव्हा आमदार झालो त्यावेळी पळस ग्रामदैवत श्री पळसाई मातेचा आशीर्वाद घेऊन लोककल्याणासाठी बाहेर पडलो. नागोठणे विभागातील जनतेने जी जी विकासकामे सांगितले ती सर्व मी प्रामाणिकपणे पुर्ण केली. त्यानंतर नागोठणे विभागातील कोणतेहीकाम शिल्लक ठेवले नाही. नागोठण्यातील मुख्य रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती त्या रस्त्याच्या कामापासून मी विकासकामांना सुरवात केली. नागोठणे विभाग माझा आहे येथील लोक माझी आहेत. येथील लोकांनी जे जे कामे सुचवली ते ते सर्व कामे मी पुर्ण केलेली आहेत. जो पर्यंत नागोठणे विभागाचा खऱ्या अर्थाने विकास होत नाही तो पर्यंत मी स्वस्थ बसणार नाही. लोकांसमोर फोकांड्या मारणे माझे काम नाही मी आमदार लोकांचा आहे प्रामाणिकपणे विकासकामे करणे हेच माझे ध्येय आहे असे उद्गार पेण सुधागड मतदार संघांचे लोकसेवक कार्यसम्राट आमदार रविंद्र पाटील यांनी काढले. डोंगरी विकास कार्यक्रम अंतर्गत तसेच खनीकर्म कार्यक्रम अंतर्गत करण्यात आलेल्या नागोठणे विभागातील विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा रविवार दिनांक ५ जून रोजी सकाळी अकरा वाजल्या पासून सायंकाळी सात वाजेपर्यंत आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते पार पडला त्यावेळी कार्यकर्त्यांना व ग्रामस्थांना मार्गदर्शन करताना आमदार रविंद्र पाटील बोलत होते. 
  यावेळी नागोठणे विभागातील पळस येथील अंतर्गत रस्त्या, वाघळी येथील अंतर्गत रस्ता, निडी येथील समाज मंदिर, वासगाव येथील धनगर वाडी तील अंतर्गत रस्ता, चिकणी येथील अंगणवाडी, पाटणसई येथील अंतर्गत रस्ता, हेदवली येथील अंतर्गत रस्ता, बाळसई येथील अंतर्गत रस्ता, वरवठणे येथील रस्ता, आमडोशी येथील गटार व रस्ते, पिंगोडे शाळा ते आंबेघर रस्ता कॉंक्रिटीकरण, आंबेघर येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, वेलशेत येथील अंतर्गत रस्ता कॉंक्रिटीकरण, वेलशेत येथील व्यायाम शाळा आदी विकासकामांचे लोकार्पण आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. 
           या लोकार्पण सोहळ्याच्या वेळी आमदार रविंद्र पाटील यांच्या समावेत भाजपा रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर, जिल्हा उपाध्यक्ष मारुती देवरे,माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे, जिल्हा उपाध्यक्षा श्रेया कुंटे, तालुका सरचिटणीस आनंद लाड,पाटणसई सरपंच माधवी सदानंद गायकर,उपसरपंच सुरेश गायकर,पं. स.सदस्य संजय भोसले,मारुती शिर्के,प्रमोद गोळे,सचिन मोदी,सिराज पानसरे, राजेंद्र लवटे,सुभाष पाटील,संतोष लाड,नामदेव मढवी,विठोबा माळी,ज्ञानेश्वर शिर्के, अपर्णा सुटे, निलिमा राजे, शितल नांगरे, मुग्धा गडकरी, मनस्वी शिर्के,धर्मा भोपी,किसन बोरकर, कोंडीराम आखाडे, तुकाराम राणे, कृष्णा मिणमिने, गणपत राणे, प्रह्लाद राणे,ऐनघर सरपंच कलावती राजेंद्र कोकळे, उपसरपंच रोहिदास लाड, श्रीकांत पाटील, गणपत म्हात्रे, भाई कर्जेकर, नथुराम म्हात्रे, नारायण म्हात्रे, मोरेश्वर म्हात्रे, परशुराम बैकर, रवि जांबेकर, सुरेश जांबेकर, उत्तम जांबेकर, राजेंद्र ताडकर, पुंडलिक ताडकर, मारुती पारंगे अरुणा म्हसकर आदी प्रमुख कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. 
 
चौकट :-    
भाजपचा झेंडा फक्त आमडोशी गावात 
एखाद्या गावात ज्या पक्षाचे आमदार, खासदार येत कोणत्यातरी कार्यक्रमानिमित्त येत असतात त्यावेळी पक्षाचा झेंडा त्या गावातील कार्यकर्ते आवर्जून लावत असतात त्यामुळे ते गाव संबंधित पक्षमय होऊन जात असते. आमदार रविंद्र पाटील यांच्या हस्ते नागोठणे विभागातील विविध गावात विकासकामांचे लोकार्पण करण्यात आले परंतु रोहा तालुका अध्यक्ष सोपान जांबेकर यांचे आमडोशी गाव वगळता एकही गावात भाजपचे झेंडे लावलेले दिसुन आले नाही. त्यामुळे फक्त आमडोशी गावातच भाजपा कार्यकर्ते आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test