बहुगुणी आवळा म्हसळा बाजारात दाखल : रोगप्रतिकार शक्ती वाढवणारा आवळा म्हणून मागणी वाढली
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
स्थानिक बाजारात रानभाज्या आल्या आहेत तर त्यातच भर घालणारा बहुगुणी आवळा म्हसळा बाजारात दाखल झाला आहे.आवळा सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढत असल्याने बाजारात मागणी बऱ्या पैकी वाढली आसल्याचे स्थानिक भाजी विक्रेते अशोक अडागळे यानी आमचे प्रतिनिधीला सांगितले. शहरांतून रु१०० ते १२० (प्रति किलो) असणारा आवळा म्हसळा शहरांत केवळ रु ७०ते रु८० प्र.की. दराने आसल्याचे सांगण्यात आले. रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात समावेश केला पाहिजे,असं डॉक्टर वारंवार सांगतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्यांना आवळा खाण्याचा सल्ला सुध्दा तज्ज्ञ डॉक्टर देतात.तसंच स्वस्त आणि सहज उपलब्ध असणाऱ्या या फळाचे फायदेच फायदे आहेत, त्यासाठी पौष्टिक आहारांत किमान रोज १ आवळा खांणं आवश्यक आहे. चवीला आंबट, तुरट आणि थोडासा गोड असा आवळा अनेकांना आवडतो. पूर्वी शाळेजवळ चिंचा-कैरी विकणाऱ्यांकडे आवळा हा आवर्जुन असायचा.दीर्घायुष्य लाभण्यासाठी आवळ्याचा आहारात आणि औषधी द्रव्य म्हणून उपयोग करतात. आवळ्यामध्ये ‘क’ जीवनसत्त्व मोठ्या प्रमाणात असतं. आयुर्वेदामध्ये आवळ्याला अत्यंत श्रेष्ठ मानलं आहे. आवळ्याच्या सेवनानं शरीर शुद्ध होऊन रोगप्रतिकारक शक्ती वाढते. "डोकं शांत राहतं.तसंच केसांच्या तक्रारीही दूर होतात. केस गळत असतील तर आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळाशी मालिश करावे.ज्यांना पित्ताचा त्रास आहे त्यांनी सकाळी ‘मोरावळा’ खाल्ल्यास फायदेशीर ठरेल"आवळ्यामध्ये क्रोमियम नामक घटक असतो. हा घटक शरीरातील कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी करण्यास मदत करतो. हा घटक हृदयाचं आरोग्य जपण्या साठी उपयोगी पडतो.आवळ्या पासून महीला वर्ग सरबत,पावडर,लोणची (आंबट/ गोड,) मोरावळा,चटणी, कँडी असे बहुविध प्रकार करतात.