Type Here to Get Search Results !

काळसुरी ग्राम सेवा मुंबई मंडळाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम संपन्न


काळसुरी ग्राम सेवा मुंबई मंडळाचा अमृतमहोत्सवी कार्यक्रम संपन्न 

● पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन

◆ काळसुरी मंडळाचे कार्य कौतुकास्पद - पालकमंत्री आदिती तटकरे यांचे गौरवोद्गार


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


म्हसळा तालुक्यातील काळसुरी ग्रामसेवा मंडळाचा ७५ वा अमृत महोत्सव समारंभ श्री छत्रपती शिवाजी मंदीर नाट्यगृह,दादर मुंबई येथे प्रमुख अतिथी पालकमंत्री आदिती तटकरे यांचे उपस्थितीत मोठ्या थाटात साजरा झाला. काळसुरी ग्रामस्थांनी ७५ वर्षे केलेल्या गाव कारभाराची आठवण, सामजिक व राजकीय क्षेत्रामधुन केलेल्या विकासाचा लेखाजोखा शब्दबद्ध लिखित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन पालकमंत्री आदिती तटकरे यांचे हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष किशोर सावकार,सचिव सुरेश घोसाळकर,म्हसळा तालुका संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष महेश शिर्के,सरपंच श्रीमती नाक्ती,विठ्ठल चाळके,किसन पाटील,गणेश नाक्ती,स्थानिक गाव अध्यक्ष चंद्रकांत बेडेकर, गाव पदाधिकारी,सदस्य, महिला मंडळ आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाला शुभेच्छा देताना पालकमंत्री आदिती तटकरे यांनी काळसुरी गावाचा अमृत महोत्सव सोहळा एक कौटूंबिक सोहळा पार पडत असल्याचा आनंद होत असताना सार्वजनिक जीवनात सामाजिक बांधिलकी जपून उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा सन्मान माझ्या हस्ते करण्यात येत असतानाच स्मरणिकेतून मंडळाने केलेल्या कार्याबाबत गावाची इथंबूत माहिती दिली आहे. ही स्मरणिका इतर गावांना देखील प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन करून पालकमंत्री आदिती तटकरे यांनी ग्रामस्थांचे कार्यकर्तृत्वाचा कौतुक करून शुभेच्छा दिल्या तसेच काळसुरी मंडळाचे कार्य कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार पालकमंत्री आदिती तटकरे यांनी केले. अधिकपणे सांगताना ग्रामस्थ मंडळासह मुंबईकर मंडळाची भूमिका अतिशय महत्वाची असते त्यामुळे त्यांनासुध्दा शासनाच्या समितीवर काम करण्याची संधी देण्यात येत आहे. मुंबईकर मंडळी व गावाकडील ग्रामस्थांनी एकमेकांसोबत समतोल साधणे गरजेचे आहे. खासदार सुनिल तटकरे, आमदार अनिकेत तटकरे तसेच माझ्या आमदार निधीतून काळसूरी येथे अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत यापुढेही गावाच्या विकासाला प्राधान्य देण्यात येईल असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test