Type Here to Get Search Results !

रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प. दळवी गुरुजी यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न


रायगड भूषण पुरस्कार प्राप्त ह.भ.प. दळवी गुरुजी यांचा अमृतमहोत्सव सोहळा उत्साहात संपन्न


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


नागोठण्याजवळील वांगणी येथील निवृत्त शिक्षक व गेली ६० वर्षे प्रपंचाबरोबरच परमार्थिक सेवा साध्य करणारे व रायगड भूषण पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. दळवी गुरजी यांचा अमृतमहोत्सव सोहळा नुकताच वांगणी येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांचे कुटुंबीय, वांगणी ग्रामस्थ, महिला मंडळ, मित्रपरिवार, चाळीस गाव वारकरी सांप्रदायिक, रोहा ते आळंदी पायी वारकरी सांप्रदायिक मंडळ व स्वा.सु. गुरूवर्य अलिबागकर महाराज प्रेमवर्धक वारकरी सांप्रदाय यांच्याकडून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 

ह.भ.प. दळवी गुरजी यांच्या या अमृतमहोत्सव सोहळ्याची सुरुवात सकाळी ७ वाजता दळवी गुरुजी यांच्या मंगलस्नानाने करण्यात आली. त्यानंतर दिवसभरात अनेक धार्मिक विधी करुन दळवी गुरुजी यांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी साखरतुला करण्यात आली. रात्री ह.भ.प. रामदास महाराज पाटील यांच्या किर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. या अमृतमहोत्सव सोहळ्यास उपस्थित राहिलेल्या अनेक मान्यवरांनी दळवी गुरुजी यांच्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले. शेवटी महाप्रसादाच्या कार्यक्रमाने या अमृतमहोत्सव सोहळ्याचा समारोप करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test