पोलादपूर तालुक्यातील सुंदरराव मोरे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एसटी महामंडळाची लालपरी दाखल.
रायगड वेध ऋषाली राजू पवार पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील एकमेव महाविद्यालय व अल्पदरात शिक्षण यामुळे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी फार लांबून यावे लागते हे पाहून शिवाई शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सुंदरराव मोरे महाविद्यालयाने महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या महाड, बिरवाडी, राजावाडी, चांढवे, लोहारे, पोलादपूर इत्यादी ठिकाणांहून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या सहाय्याने २८ जून मंगळवार रोजी महाविद्यालयात येण्या जाण्यासाठी एसटी बस सेवा उपलब्ध करून दिली यामुळे अनेक मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना खूप फायदा झाला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दीपक रावेरकर, ज्येष्ठ प्राध्यापक डॉक्टर नाथिराम राठोड व सर्व सहाय्यक प्राध्यापक यांच्या पुढाकाराने एसटी बस सेवा सुरू करण्यात आले. सदर एसटी बस पोलादपूर येथील सुंदरराव मोरे महाविद्यालयात येण्यासाठी सकाळी ६:३० मिनिटांनी दररोज महाड एसटी बस स्थानकातून सुटेल तसेच त्यानंतर बिरवाडी, ढालकाठी चांढवे, राजावाडी, पार्ले, लोहारे, पोलादपूर अशा अनेक ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात सोडण्यात येईल यामुळेच या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात येण्यासाठी रिक्षा, बस, खाजगी वाहनांचा वापर करावा लागत होता परंतु आता एसटी बस महाविद्यालय सुरू झाल्याने महाविद्यालय घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सोयीस्कर झाले आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेऊन सदर बस सेवा करून कालावधीनंतर पुन्हा सुरू करण्यासाठी महाड आगार व्यवस्थापक श्री शिवाजी जाधव आणि पोलादपूर एसटी बस स्थानक नियंत्रक श्री सुतार यांचे विशेष सहकार्य लाभले सदर सेवा उपलब्ध करून दिल्याबद्दल महाविद्यालयाने महाड आगाराचे विशेष आभार मानले व लांबून येणारे सर्व विद्यार्थ्यांनी सदर बस सेवेचा जास्तीत जास्त लाभ घेत आहेत व महाविद्यालय व एसटी महामंडळाचे आभार मानले.