Type Here to Get Search Results !

आरोग्य सहाय्यिका नमिता म्हात्रे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त


आरोग्य सहाय्यिका नमिता म्हात्रे ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 आरोग्य खात्यामध्ये आरोग्य सहाय्यिका म्हणून कार्यरत असणाऱ्या नमिता नारायण म्हात्रे या आपल्या आरोग्य खात्यातील ३८ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२२ रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात निवृत्त झाल्या. याच निमित्ताने प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे नमिता म्हात्रे यांना निरोप देण्यासाठी तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यासाठी निरोप समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला होता. या निरोप समारंभात वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट यांनी ३८ वर्षे आरोग्य खात्यात आरोग्य सहाय्यिका म्हणून निस्वार्थीपणे सेवा पुलविल्याबद्दल नमिता म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करीत त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहाय्यक यशवंत कर्जेकर, रमेश हंबीर,आरोग्य सेवक वंदन तांबोळी, जयवंत मोकल,देवा इंगळे,आरोग्य सहाय्यिका तनुजा तेलंगे,भाऊ आमडोस्कर,नंदा पाटील, दामोदर भोईर, प्रविण पाटील, सुहास भुजबळ, रश्मी भुजबळ,राज म्हात्रे,श्वेताली म्हात्रे यांच्यासह कर्मचारी वृंद शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
 नमिता म्हात्रे या २१ सप्टेंबर १९८४ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र पाली अंतर्गत असणाऱ्या उपकेंद्र उध्दर येथे आरोग्य सेविका म्हणून रुजू झाल्या. या ठिकाणी त्यांनी सुमारे २७ वर्षे रुग्णांची सेवा केली. २७ वर्षे लोकसेवा केल्यानेच उपकेंद्र उध्दर अंतर्गत येणाऱ्या गावातील नागरिकांसोबत म्हात्रे यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते. यानंतर २०११ साली प्राथमिक आरोग्य केंद्र कोकबण अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्र विरजोळी येथे म्हात्रे यांची बदली झाली. या ठिकाणी त्यांनी तीन वर्षे सेवा बजावल्यानंतर २०१४ रोजी त्या प्राथमिक आरोग्य केंद्र नागोठणे येथे रुजू झाल्या. याठिकाणी रुग्णांची सेवा करून ३१ मे २०२२ रोजी त्या सेवानिवृत्त झाल्या. यावेळी त्यांनी कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या काळात नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाच्या वेळी आपल्या जिवाची पर्वा न करता काम केले.नमिता म्हात्रे यांचे पती नारायण बाबुराव मात्र ही सुद्धा आरोग्य खात्यात लेप्रसी टेक्निशियन म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुद्धा सुमारे ३८ वर्षे आरोग्य खात्यात राहून लोकांची सेवा केली. यावेळी त्यांनी श्रीवर्धन, रोहा, पेण, पाली या तालुक्यात सेवा बजावत तेही पाली येथे नुकतेच निवृत्त झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test