Type Here to Get Search Results !

मौजे-कातळपाडा येथील श्री.गणेश सखाराम गुळेकर श्रीवर्धन येथे आरोग्य सेवेतून निवृत्त.


मौजे-कातळपाडा येथील श्री.गणेश सखाराम गुळेकर श्रीवर्धन येथे आरोग्य सेवेतून निवृत्त.


 रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर


बुधवार दि.२ जून रोजी जिल्हा उपकेंद्र श्रीवर्धन येथे डॉ.श्री.मधुकर दिगंबर ढवळे,वैद्यकीय अधिक्षक-उप जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन,ग्रामीण रुग्णालय म्हसळा,यांनी इथे पस्तीस वर्ष सेवा केली.
व्रणोपचार उप-जिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथील कर्मचारी श्री.गणेश सखाराम गुळेकर,असे अधिकारी व कर्मचारी दोघेही नियत वयोमाना नुसार  दि.३१/५/२०२२ रोजी शासकीय सेवेतुन निवृत्त.
रुग्णालयाच्या वतीने प्रमुख अतिथी सन्मानिय खासदार सुनीलजी तटकरे यांच्या हस्ते सत्कार होणार होता.परंतु काही अडचणीं मुळे खासदार येऊ शकले नाहीत.मात्र मा.आमदार अनिकेत तटकरे यांच्या यांच्या प्रमुख उपस्थितीत निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला.

यावेळी तहसिलदार सचिन गोसावी, माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक, माजी सभापती सुकुमार तोंडलेकर, डॉ.महेंद्र भरणे, डॉ.सलील ढलाईत, डॉ.अबू राऊत, शबिस्ता सरखोल, बोर्ली-पंचतन उप-सरपंच नंदकिशोर भाटकर,रुग्णालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

श्री.गणेश सखाराम गुळेकर मूळ-गाव कातळपाडा,१९९२ पासून श्रीवर्धन येथे कायम वास्तव्य...एक स्वामी भक्त,गेली ३० वर्ष समाज बांधवांच्या सुख दुःखात सहभागी....भंडारी समाजात दांडगा परीचय,समाजात अनेक विवाह जुळविण्यात यशस्वी....लहान पणा पासूनच हुशार,जिद्दी व अभ्यासू वृत्ती,समाज सेवेची आवड,थोडासा रागीट पण तितकाच प्रेमळ स्वभाव,हसमुख चेहरा आणि एक बोलकं व्यक्तिमत्व,अन्याया विरुद्ध चिढ,शाळेतच नाही तर कातळपाडा-अलिबाग गावातील एक हुशार विद्यार्थी अशी त्यांची ओळख.त्याकाळी घरांमध्ये विद्युत पुरवठा (लाईट) नसताना देखील मेणबत्ती व रॉकेलच्या दिव्यांच्या प्रकाशावर अभ्यास करून सतत प्रत्येक वर्गामध्ये प्रथम,द्वितीय क्रमांक संपादन करत.सातवी मध्ये असताना त्यांनी केंद्राच्या परीक्षेत केंद्रामध्ये प्रथम क्रमांकाने येण्याचा मान पटकावला होता.घरच्या परिस्थिती मुळे पुढील शिक्षण जेमतेम एस्.एस्.सी.(मॅट्रिक) पर्यंतचे शिक्षण अर्धवट घेतले.
             कुटुंबाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर होती.आता पैसा कमावण्यासाठी काही तरी काम,धडपड करावीच लागेल,ह्या हेतूने कोणत्याही कामाची तमा व लाज न बाळगता,काम करण्याची जिद्द मना मध्ये रुजविली स्वतःला कधी कमी लेखणार नाही,काहीतरी करून दाखवणार असा मनाशी दृढ निश्चयच केला होता.त्या नुसार प्रथम एका फायुस्टार हॉटेल मध्ये वेटर म्हणून तर एका औषधाच्या कंपनी मध्ये हमाल म्हणून मग एक्सपोर्ट इंम्पोर्ट कंपनीमध्ये ५०० रुपये पगारावर काम केलं त्या नंतर एका गारमेंट कंपनी मध्ये ८ रुपये रोजमदारी वर काम अशा अनेक ठिकाणी कामे करून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यास प्रयत्नांची पराकाष्ठा केली.हे करत असतांना जिथे भरती असेल तिथे अर्ज करत एअर इंडिया,महाराष्ट्र पोलीस दल,आरोग्य सेवा,महाराष्ट्र परिवहन महामंडळ व आश्रम शाळा अशा विविध ठिकाणी अर्ज करून मुलाखती दिल्या परंतु पदरी येणाऱ्या अपयशाने नाराज न देता,हार न मानता,माघार न घेता,मनाशी दृढ निश्चय करून,मी सरकारी नोकरी मिळविणारच ह्या हेतूने सतत प्रयत्न करीत राहिले.
                  आणि तो दिवस उगवला १९८८ साली आरोग्य सेवेत भरती होऊन प्रथम प्रयोग शाळा सहाय्यक पदी २ वर्ष प्रशिक्षण घेऊन १९९०साली पेण येथील सरकारी रुग्णालया मध्ये कायम स्वरूपी सरकारी आरोग्य सेवेत समाविष्ट झाले.तिथे २ वर्ष काम करून १९९२ साली त्यांची बदली श्रीवर्धन येथील उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे झाली.२०१९ साली त्यांना व्रणोपचार पदी पदोन्नती मिळाली.२ वर्ष पेण इथे रुग्णाची सेवा करून पुढील ३० वर्ष ६ महिने म्हणजे आज पर्यंत श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाची सेवा केली.इथे प्रामाणिक पणे कर्तव्य बजावत असतांना.त्यांच्या कॉर्टर्स तिथेच असल्याने.रुग्णांच्या अडी अडचणीच्या वेळी त्यांची पत्नी सौभाग्यवती मनीषा गणेश गुळेकर या दोघांनीही त्यांचे नातेवाईक रुग्ण असो किंवा ओळखीचा की अनोळखी रुग्ण असो त्यांना कायम सहकार्य करत राहिले.अगदी चहा-नाष्टा,जेवण सुध्दा पुरविल्याचे कित्येक जण सांगतात.अश्या आपल्या साडे बत्तीस वर्षाच्या कारकिर्दीत शासकीय आरोग्य सेवेत दिलेले समर्पण कार्यरत राहून आपली नियमित व कणखर पणे रुग्णांची सेवा केली आहे.विशेषतः त्यांना मधूमेहाचा त्रास असतांनाही मागील दोन वर्षांतील कोरोना काळातही त्यांनी निष्ठेने काम केलं आहे.शासकीय नियम नियत वयोमाना नुसार वयाची ६० वर्ष पूर्ण करून उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन येथे दि.३१ मे २०२२ रोजी ३२ वर्ष ४ महिने अखंडित निष्कलंक सेवानिवृत्त झाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test