प्रशासन आणि जनतेला जोडण्याचे काम पत्रकार करतो-अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
सामान्य जनता आणि प्रशासनाला जोडण्याचे प्रामाणिक काम हा पत्रकार करीत असतो.पत्रकारांच्या माध्यमातूनच गोरगरीब जनतेचे प्रश्न शासनापर्यंत पोहचतात.असे गौरवोद्गार रायगड जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी काढले.शुक्रवार दि.१० जून रोजी तळा पोलीस ठाण्याला त्यांनी भेट दिली असता पत्रकारांशी साधलेल्या संवादाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी तळा बाजारपेठेत अल्पवयीन मुलांचे वाहन चालविण्याचे प्रमाण वाढले असून बाजारात बेशिस्तपणे वाहन पार्क केले जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते त्यामुळे शहरात वाहतूक पोलिसाची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी पत्रकारांकडून करण्यात आली.त्याला सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात येईल असे आश्वासन अतुल झेंडे यांनी पत्रकारांना दिले.तसेच तळा शहर व तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा देखील करण्यात आली.शेवटी पत्रकारांतर्फे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.याप्रसंगी तळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे, संजय रिकामे,संध्या पिंगळे, विराज टिळक,नजीर पठाण,सुरज पुरारकर आदी पत्रकार उपस्थित होते.