तळा तालुक्यातील अडनाले येथून ८० वर्षीय वृद्ध बेपत्ता
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा तालुक्यातील अडनाले येथून ८० वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की अडनाले येथील कानू बाबू लाखन (वय८०) हे दि.८ जून रोजी शेतावर जाऊन येतो असे सांगून घरातून बाहेर पडले.मात्र उशिरापर्यंत घरी परतले नसल्याने त्यांच्या मुलाने तळा पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली.कानू लाखन यांची उंची ५ फूट,शरीर बांधा सडपातळ, चेहरा गोल,रंग निमगोरा,केस बारीक असून घरातून निघताना अंगावर सफेद टीशर्ट व सफेद हाफ पॅन्ट घातली असून आशा वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास तळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.