आरोग्य विभागातील कारकूनाने अभिलेख सुस्थितीत ठेवला नाही : कर्मचारी चिंतेत.
२३ जूनला उपोषण निश्चित.
मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी येणार अडचणीत
रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा
म्हसळा तालुक्यांतील आरोग्य विभागांत आरोग्य विषयक त्रुटी अनेक असतानाच सेवा आणि कर्मचारी वर्ग या विषयीच्या टिका होत आसत आता दस्तुरख़ुद्द कर्मचाऱ्यानी खात्यातील कारकून मयुर खांबे यांच्या मनमानी कारभाराची वरीष्ठ दखल घेत नसल्याने उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. संबधीत कारकून गटविकास अधिकारी आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मर्जितील आसल्याने त्याच्याकडे अन्य प्राथमिक आ. केंद्रानाही आर्थिक कामकाजाविषयी मदतीचे काम देण्यात येत असे. प्रा.आ. केंद्रांतील कर्मचाऱ्यांची ,सेवा पुस्तके, D.C.P.S., पगार, मिळणारे वेतन, भत्ते, अतिरीक्त रक्कम पगारांत जमा करणे अशा विविध आर्थिक अभिलेखा बाबत नियमीतता ठेवली नसल्याने आमचे अनेक मुद्यांबाबत सदरच्या कर्मचाऱ्याने समाधान केले नाही, त्याच पद्धतीने स्थानिक, तालुका पातळीवरील आधिकाऱ्यानी आमच्या आर्थिक अभिलेखातील त्रुटींची पुर्तता करून घ्यावी या मागणीकडे गांभीर्याना न बघीतल्यामुळे आम्ही गुरवार दि.२३जून २२ रोजी एक दिवसाचे उपोषण करणार असल्याचे प्रा.आ. केंद्र खामगावच्या आरोग्य सेविका श्रीमती स्नेहलता खैरे, स्त्रिपरिचर प्रेषिता सातनाक, आरोग्य सेवक कैलास घरत, आरोग्य सहाय्यीका संगिता सारंगे यानी जिल्हा व तालुका प्रशासनाला योग्य कालावधीत पत्र देऊन अंतीम पर्याय उपोषण हे पत्राव्दारे कळविले आहे. गेले ७ ते ८ वर्ष सेवा पुस्तके, D.C.P.S. मध्ये योग्य नोंदीच नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
" ज्या कार्यालयातील कर्मचाऱ्या कडून दप्तर दिरंगाई, गैरव्यवहार/ गैरप्रकार झाले असतील त्या कार्यालयाचे प्रमुखाने या प्रकरणांत तात्काळ लक्ष घालून संबंधीतांवर अचूक दोषारोप पत्र ठेवणे आवश्यक होते, त्याकडेही तालुका आरोग्य आधिकरी, गट विकास आधिकारी यानी लक्ष देणे आवश्यक होते."
"सेवा पुस्तक हे अभिलेख जतनाच्या "अ" वर्गात मोडते. त्याचे प्रदीर्ध कालावधीपर्यंत जतन करून ठेवणे आवश्यक आसते, सेवा पुस्तक हे संबंधीतर कर्मचान्याचे सेवेचा महत्वाचा अभिलेख आहे, सेवा पुस्तक अर्पूण असेल /नसेल /काहीआक्षेप असतील तर कर्मचाऱ्यास निवृत्तीनंतरचे देय लाभ मिळण्यास अडचणी येतात. प्रत्येक कर्मचाऱ्याने आपले मूळ/ दुय्यम सेवा पुस्तक अद्ययावत/सुस्थितीत आहे का?त्यात आवश्यक नोंदी आहेत का ? याची खातरदारी करणे आवश्यक आहे"