• पर्यावरणास सहाय्यभुत ‘तेजोनिधी`चे लोकार्पण
• गोरेगाव ग्रामपंचायतची होणार फार मोठी बचत
रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव
गोरेगांव ग्रामपंचायत, रोटरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि गोरेगांव रोटरीच्या संयुक्त विद्यमाने गोरेगांवमध्ये पर्यावरणास सहाय्यभुत ‘तेजोनिधी ` या सौरउर्जेवरील प्रकल्पाचे सोमवारी सायंकाळी गोरेगांव येथे लोकार्पण करण्यात आले.या तेजोनिधी सौरऊर्जा प्रकल्पाच्या सहाय्याने ग्रामपंचायत गोरेगाव मध्ये पाणीपुरवठा होणार आहें आणि यामुळे ग्रामपंचायतीची सुमारे 60% बचत होउन फार मोठी बचत होणार आहें.
या कार्यक्रमास रोटे पंकज शहा यांच्यासह पीडीजी रेाटे सौ. रश्मी कुलकर्णी , विनय कुलकर्णी , डीआरएफसी डॉ. गिरीश गुणे, संतोष मराठे, प्रकल्प समन्वयक डॉ. राजीव गोखले , प्रोजेक्ट चेअरमन डॉ. विवेक शेठ, लोकनेते विजयराज खुळे , श्रीनिवास बेंडखळे, सरपंच जुबेर अब्बासी, उद्योजक मुख्तार वेळासकर, प्रकाश हरवंडकर, सामाजिक कार्यकर्ते विकास गायकवाड, उपसरपंच विनोद बागडे, गोरेगांव पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एस. एस. नावले, महावितरणचे कार्यकारी अभियंता गणेश पाचपोहे यांच्यासह गोरेगांव रोटरीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
यावेळेस बोलताना पंकज शहा यांनी, रोटरी क्लब ऑफ गोरेगांव आणि ग्रामपंचायत गोरेगांवने रोटरीच्या माध्यमातून राबविलेला सौरउर्जेवरील हा प्रकल्प जगातील पहिलाच प्रकल्प असून, या प्रकल्पाची रोटीरी या आंततराष्ट्रीय नियतकालिकाने दखल घेतलाचा विशेष आनंद असल्याचे सांगितले.
आपल्या प्रास्तविकात डॉ. राजीव गोखले यांनी रोटरीने गेल्या 22 वर्षात गोरेगांव व परिसरात राबविलेल्या प्रकल्पांची माहिती दिली.
तर डॉ. विवेक शेठ यांनी या प्रकल्पाच्या संकल्पनेपासून हा प्रकल्प कार्यान्वित होईपर्यंत ज्यांनी या प्रकल्पाला सहाय्य केले, देणग्या दिल्या याबाबत सविस्तर माहिती देत, या प्रकल्पाला सढळ हस्ते मदत करणारे डॉ. वहाब काझी, संतोष कोल्हटकर, सौ. जया कोल्हटकर, हसनमियॉ वेळासकर यांना रोटरीचे मानद सदस्यपद देत असल्याचे डॉ. विवेक शेठ यांनी जाहीर केले.
यावेळी श्रीनिवास बेंडखळे, विजयराज खुळे , गणेश पाचपोहे, जुबेर अब्बासी, डॉ. गिरीश गुणे, सौ. रश्मी कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी हा प्रकल्प उभारणीत ज्यांचे प्रत्यक्ष योगदान आहे, त्या डेल्टा इले. ॲन्ड कंस्ट्रक्शन कंपनीच्या टीमचा तसेच महावितरणचे कार्यकारी अभियंता श्री. पाचपोहे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
वाचलेल्या पैशातून लोकोपयोगी कामे व्हावीत- ना. अदिती तटकरे या प्रकल्पाच्या लोकार्पण्ाप्रसंगी रायगडच्या पालकमंत्री ना. अदिती तटकरे या उपस्थ्ाित राहण्ाार होत्या. मात्र, त्यांचा दुसरा नियोजित कार्यक्रम असल्यामुळे त्या संध्याकाळच्या कार्यक्रमाला जरी उपस्थित राहिल्या नाहीत, तरी त्यांनी दुपारी या प्रकल्पाला भेट देऊन, गोरेगांव रोटरी व ग्रामपंचायतीचे कौतुक केले. यावेळी त्यांनी रोटरीच्या माध्यमातून राबविलेला जगातील हा पहिलाच प्रकल्प असून, यामुळे ग्रामपंचायतीच्या वीज बिलात 50 ते 60 टक्के बचत होण्ाार असल्याने या वाचलेल्या पैशातून लोकोपयोगी कामे व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा प्रकल्प इतरांसाठी आदर्श ठरेल - आ. भरत गोगावले
आ. भरत गोगावले हे देखील संध्याकाळच्या लोकार्पण कार्यक्रमास जरी उपस्थ्ाित राहू शकले नाहीत, तरी त्यांनीही दुपारी या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी त्यांनी रोटरी व गोरेगाव ग्रामपंचायतीने राबविलेला हा प्रकल्प परिसरातील इतर ग्रामपंचायतींसाठी एक आदर्श प्रकल्प ठरेल, असा विश्वास व्यक्त केला.