अज्ञातांनी कट केली मुख्य डीपीतुन विजवाहिनी
● खामगाव कासारमलई गावातील घटना
● पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
म्हसळा तालुक्यातील ग्रामपंचायत खामगाव हद्दीतील कासारमलई गावातील आणि खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या परिसरातील वीजपुरवठा करणारी मुख्य वीज वाहिनी अज्ञातांनी कट केल्याची घटना दि.11 जून 2022 रोजी घडली आहे. सदर प्रकाराबाबत विजवीतरणच्या वतीने म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर प्रकार कोणीतरी जाणूनबुजून केलेला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की खामगाव ग्रामपंचायतिच्या सरपंच सौ.प्रियांका प्रसन्न निंबरे यांचे दिर श्री.सदानंद रामचंद्र निंबरे यांचा 50 वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा कार्यक्रम त्यांच्या राहत्या घरी कासारमलई गावात आयोजित करण्यात आला होता. वाढदिवसाच्या दिवशी रात्री केक कापायच्या वेळीच गावातील मुख्य विजवाहिनी कट करून सर्वत्र अंधार करण्यात आला होता.
आमच्या भाऊंच्या वाढदिवसाच्यावेळी फक्त कासारमलई गावातीलच लाईट बंद करण्याचा जो प्रकार घडला तो कोणीतरी जाणूनबुजून केला असावा असे आम्हाला संशय आहे आणि हा राजकिय सूडबुद्धीने केलेला किळसवाणा प्रकार आहे. असे मत म्हसळा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रसन्न निंबरे यांनी माहिती देताना व्यक्त केले आहे. तसेच या ठिकाणी खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्र असून दवाखान्यात वॅक्सिंन चा साठा आहे तो देखील लाईट बंद केल्यामुळे खराब झाला असता, त्यामुळे या घटनेची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी प्रसन्न निंबरे यांनी विजवीतरण विभागाकडे केली आहे.
प्रतिक्रिया :-
"खामगाव ग्रामपंचायत हद्दीतील मुख्य डीपीतून फक्त कासारमलई गावाचीच वीजवाहिनी लाईन कट केलेली होती हे मी स्वतः त्याच दिवशी रात्री उपस्थित राहून प्रत्यक्ष पाहिले आहे. सदर लाईन कट करण्याचा प्रकार कोणीतरी जाणूनबुजून केलेला आहे. याबाबत मी माझे वरिष्ठ अधिकारी (जेई) यांना कळविले होते."
सुशांत खडस
वायरमन - खामगाव
"दि.11 जून रोजी खामगाव कासारमलई येथील मुख्य डीपीतून लाईन कट केली आहे अशी माहिती मला आमचे वायरमन कडून मिळाली होती. याबाबत मी आमचे वरिष्ठ अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली काल दि.14 जून रोजी म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सदर घटनेची चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे."
श्रीमती पल्लवी तोडकर
जे.ई.अधिकारी - विजवीतरण कंपनी म्हसळा