Type Here to Get Search Results !

म्हसळा तालुका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, हिंदु ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेठ करडे यांचे दुःखद निधन


म्हसळा तालुका शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, हिंदु ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष सुभाष उर्फ बाळशेट करडे यांचे दुःखद निधन


रायगड वेध संजय खांबेटे म्हसळा


म्हसळा शहर हिंदू ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष,तालुक्याचे ज्येष्ठ शिवसैनिक,रायगड जिल्हा परिषद माजी विरोधी पक्षनेते सुभाष उर्फ बाळशेट करडे यांचे दिनांक ६ जुन २०२२ रोजी रात्री दहा वाजता राहते घरी हृदविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले.निधनासमई त्यांचे वय ७३ वर्षे होते.म्हसळा तालुक्यात शिवसेना स्थापने पासुनचे पाहिले शाखाप्रमुख,जिल्हा परिषद सदस्य,विरोधी पक्ष नेते,तालुका हिंदु व शहर ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष,तालुका शांतता समिती प्रमुख,शासनाचे तंटामुक्त समिती अशा विविध प्रकारच्या विविध सामजिक व राजकीय संस्थाचे पदावर त्यांनी जबाबदारीने काम केले होते.म्हसळा तालुक्यात सर्वधर्म समभाव राखुन गाव विकासात त्यांचा हातखंडा होता, म्हसळा स्थानीक स्वराज्य संस्थां, तालुका पंचायत समितीची सत्ता स्थापनेत तसेच सेनेचा पहिला आमदार निवडून आणण्यासाठी बाळशेट करडे यांचा मोलाचा वाटा होता. निर्भिडपणा,स्पष्ट वक्ता आणि कडवट शिवसैनिक म्हणुन सुभाष उर्फ बाळशेट करडे यांची सर्वत्र ओळख होती.अनेक जण त्यांना प्रेमाने भाऊ अशी हाक मारत असत.त्यांचे मृत्यु पश्चात मुलगा,मुलगी,सुन,जावई,पुंतणे,नातवंडे आणि आप्तेष्ट असा मोठा परिवार आहे.बुधवार दिनांक ०७/०६/२०२२ रोजी सकाळी १० वाजता म्हसळा हिंदू स्मशान भूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.या वेळी सामजिक,राजकीय क्षेत्रातील सर्वच मंडळीने त्यांचे अंत्यदर्शन घेऊन भावपुर्ण श्रध्दांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test