Type Here to Get Search Results !

जेष्ठ समाजसेवक के. झोराबियन याचे अल्पशा आजाराने निधन


जेष्ठ समाजसेवक के. झोराबियन याचे अल्पशा आजाराने निधन


रायगड वेध  समाधान दिसले खालापूर


       खालापूर तालुक्यातील डोळवली येथील झोराबियन चिक्स प्रा.लि.चे मालक के.झोराबियन यांचे रविवारी रात्री मुंबई येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे. तर निधनाने गोरगरिबांचा कैवारी - अन्नदाते - दानशूर व्यक्तिमत्व हरवल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. 


           डोळवलीसह खालापूर तालुक्यातील अनेक गावातील सामाजिक उपक्रमांना त्यांनी अनेकदा सढळ हाताने मदत केली होती तर कोरोना काळात झोराबियन शेठ यांचे कार्य उल्लेखनीय ठरल्याने या काळात जवळपास 2000 हजाराहून अधिक कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केल्याने गोरगरिबांची पोटाची भूक भागली गेली. तर आपल्या कंपनीत त्यांनी सर्व धर्मभाव जोपासला होता, कंपनीच्या आवारात सर्व धर्माचे कामगार - स्टाफ गुण्यागोविंदाने रहात आहेत. मग ईद असो, क्रिसमस असो अथवा गणपती सण - दिवाळी सण, झोराबियनशेठ व त्यांचे कुटुंबीय सर्वांच्या सोबत ते सण साजरे करीत असे. त्यामुळे सर्वच कामगार व स्टाफ यांच्या त्यादृष्टीने झोराबियनशेठ हे त्यांचे दैवत होते. के.झोराबियन यांचे डोळवली परिसरातील गावातील लोकांशी खूपच घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते, के.झोराबियन कंपनीत आले असतील असे समजले तर त्यांना भेटण्यासाठी गेटवर ग्रामस्थ आवर्जून येत असत, आणि शेठ ही सर्वांना भेटत असे, त्यांचा पाहुणचार व त्यांच्याशी वैयक्तिक पातळीवर त्यांच्या कुटुंबाची चौकशी करीत असे, त्यामुळे शेठ हे सर्वांनाच आपलेसे वाटत असे. के.झोराबियन त्यांच्या निधनाच्या वृत्ताने परिसरात दुःखाची छाया पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत असताना सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्ती गेल्याची भावना अनेक जण व्यक्त करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test