Type Here to Get Search Results !

नागोठणे येथे पेण पाली एसटी बसला अपघात१० विद्यार्थ्यांसह एक जेष्ठ नागरिक जखमी


नागोठणे येथे पेण पाली एसटी बसला अपघात
१० विद्यार्थ्यांसह एक जेष्ठ नागरिक जखमी 


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 येथील नागोठणे शिहू मार्गावर सर्कलच्या अलीकडे हॉटेल लेक व्ह्यू च्या पुढे पेण हून पाली येथे जाणार्या एस टी बसला नागोठणे बस स्थानकातून पेण बाजूकडे जाणार्या एस टी बसने ठोकर दिल्याने झालेल्या अपघातात पेण पाली या एसटी बसमधील नागोठणे येथील शाळेत व कनिष्ठ महाविद्यालयात येणारे दहा विद्यार्थी आणि एक जेष्ठ नागरिक यांना किरकोळ दुखापती होऊन ते जखमी झाले आहेत.
या अपघाता संदर्भात नागोठणे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. २० जून रोजी सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास एस टी च्या रोहा आगारात कार्यरत असणारे चालक सायस विठ्ठल चाटे वय ४१ हे आपल्याकडील बस क्र. एम एच २० बी एल ४१०६ या बसने पेण ते पाली अशी आपली ड्युटी बजावत असताना बस नागोठणे येथील हॉटेल लेक व्ह्यू च्या पुढे रिलायन्स चौकाच्या अलीकडे आली असता याचवेळी पेण बाजूकडे जाणार्या एसटीच्याच बस क्र. एम एच २० बी एल २७६० यातील चालक माधव सर्जेराव चाटे यांनी आपल्याकडील बस अतिवेगाने चुकीच्या दिशेने चालवून पेण पाली या बसला समोरील चालकाच्या बाजूस ठोकर दिली. यावेळी पेण पाली या बसचे चालक सायस चाटे यांनी आपल्याकडील बस प्रसंगावधान दाखवून वेळीच नियंत्रित केल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातात विनय दगडु शिर्के (वय १८ वर्षे) रा. पळस, धनश्री भगवान शिर्के (वय १७ वर्षे) रा.पळस, सानिका गजानन भोय (वय १७ वर्षे) रा.निडी, निशिता हरिश्चंद्र बोरकर (वय १६ वर्षे), स्नेहल हरीभाऊ बडे (वय १७ वर्षे) रा.कोलेटी, वैष्णवी विठ्ठल कदम, अश्विनी रमेश बडे वय १७ रा.कोलेटी, निरज भास्कर म्हात्रे, वेदांत दशरथ म्हात्रे, रोहीत मोकल व मधुकर लक्ष्मण शिर्के (वय ७० वर्षे) रा.पळस हे या अपघातात किरकोळ दुखापती होऊन जखमी झाले आहेत.या सर्व जखमींना नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात व माया लक्ष्मी नर्सिंग होम येथे प्राथमिक उपचार करण्या आले.या अपघाताची नोंद नागोठणे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून पोलिस निरीक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ह. जी.एस.भोईर हे पुढील तपास करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test