Type Here to Get Search Results !

किशोर देशपांडे राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य आर्बिटर परीक्षा उत्तीर्ण


किशोर देशपांडे राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक व महाराष्ट्र राज्य आर्बिटर परीक्षा उत्तीर्ण


रायगड वेध गिरीश गोरेगावकर माणगाव


गोरेगाव सारख्या ग्रामीण भागात सहा वर्षांपूर्वी श्री किशोर देशपांडे यांनी देशपांडे अकॅडमी सुरू केली या सहा वर्षाच्या कालावधीत त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये बुद्धिबळ या खेळात देशपांडे चेस अकॅडमी चे वर्चस्व निर्माण करत सहा अंतरराष्ट्रीय खेळाडू घडवले तर यातील कुमार वेदांत गांधी यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी ग्रँडमास्टर श्री अभिजीत कुंटे यांच्या सोबत खेळताना त्यांना सामना बरोबरीत रोखण्यास भाग पाडले होते
 ऑल इंडिया चेस फेडरेशन मार्फत चेस प्रशिक्षक म्हणून घेण्यात येणाऱ्या परीक्षेत श्री किशोर देशपांडे हे राष्ट्रीय बुद्धिबळ प्रशिक्षक म्हणून उत्तीर्ण झालेच पण बुद्धिबळातील पंच म्हणजेच ज्याला बुद्धिबळ या खेळाचे आर्बिटर असे बोलले जाते ती महाराष्ट्र राज्य आर्बिटर ही परीक्षा देखील उत्तीर्ण झाले बुद्धिबळ या खेळासाठी मेहनत घेणाऱ्या श्री किशोर देशपांडे यांना या यशस्वी कामगिरी बद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test