नागोठण्यातून पार्किंग केलेल्या मोटारसायकलची चोरी
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
नागोठणे पोलीस ठाणे हद्दीतील नागोठणे मुस्लीम समाजाची दफन भुमीच्या जवळ रस्त्यावर पार्किंग करून ठेवलेली काळ्या रंगाची मोटारसायकल (क्र. एम.एच.०६ बी.आर ६८५६) कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरी केल्याची घटना बुधवार दिनांक ११ मे, २०२२ रोजी रात्री ९.३० वा ते गुरुवार दि. १२ मे, २०२२ रोजी रात्री ९.३० वा च्या दरम्यान घडली आहे. या मोटारसायकलची अंदाजे किंमत रूपये १५ हजार एवढी आहे.
या मोटारसायकलचा मालक ओंकार परशुराम लेंडी रा.उसर ठाकूरवाडी ता. रोहा यांनी याबाबत नागोठणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार नागोठणे पोलिस ठाण्यात गु.र.नं.६३/२०२२, भा.दं.वि.क. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अधिक तपास नागोठणे पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक तानाजी नारनवर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आर.एस.पाटील हे करीत आहेत.