संवाद धारवली रस्त्याच्या जीर्णोद्धारासाठी सामाजिक कार्यकर्त्यांकडून लाक्षणिक उपोषण
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
पोलादपूर तहसील कार्यालयासमोर पोलादपूर तालुक्यातील भोराव ते सवाद धारवली रस्त्याच्या नूतनीकरणासाठी कावली गावाचे सामाजिक कार्यकर्ते अब्दुल हक खलफे यांनी ५ मे रोजी लाक्षणिक उपोषणास बसले होते.
संवाद धारवली रस्त्याच्या जीर्णोद्धारासाठी व महाड सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अनागोंदी कारभारा विरुद्ध तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसणार असल्याचे संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना एप्रिल महिन्यात लेखी पत्राद्वारे कळविले होते.
आमदार भरतशेठ गोगावले यांनी भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या नूतनीकरणाचा कामासाठी शासनाच्या बजेटमधून आठ कोटी रुपये मंजूर केले असून पावसाळ्यानंतर रस्त्याच्या नूतनीकरणाला सुरुवात होणार असून पावसाळ्यात तोंडावर आला असल्याने नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास होऊ नये म्हणून आमदार भरतशेठ गोगावले यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना खड्डे भरण्याच्या सूचना केल्या भोराव ते सवाद धारवली हा रस्ता महाड विभागाकडे वर्ग केला आहे तो पुन्हा पोलादपूर सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करावा ही मागणी देखील केली आहे.
पोलादपूरचे ज्येष्ठ पत्रकार शैलेश पालकर यांनी अब्दुल हक खलफे यांच्या लाक्षणिक उपोषणास पाठिंबा देऊन सकाळपासून त्यांच्याबरोबर उपोषणाला बसले होते तसेच पत्रकार आमीर तारलेकर यांनी भेट घेतली तसेच सामाजिक कार्यकर्ते समीर भाई चिपळूणकर, शेकाप नेते चंद्रकांत सणस, सचिन महाडिक, असगर खलफे व कालवी गावचे ग्रामस्थ उपस्थित होते.