चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून ८ वर्षाची मुलगी ठार तर तीन जण जखमी
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा तालुक्यातील चरई आदिवासी वाडी येथे भिंत कोसळून आठ वर्षाची मुलगी मृत पावली असून तीन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की चरई आदिवासी वाडी येथे रहात असलेल्या सुनिता अशोक मुकणे या आपल्या चार मुलांसह घरी झोपल्या असता सकाळी ४.१५ च्या सुमारास मोठा आवाज झाल्याने त्या जाग्या झाल्या असता घराच्या मागच्या बाजूची भिंत कोसळून त्याखाली सुवर्णा मुकणे,संतोष मुकणे,तन्वी मुकणे,तुषार मुकणे,ही आपली मुले ढिगाऱ्याखाली अडकल्याचे त्यांनी पाहिले.व तात्काळ त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला.त्यांचा आवाज ऐकूनच शेजारी रहात असलेले ग्रामस्थ मदतीसाठी धावून आले व त्यांनी ढिगारा बाजूला करून सर्व जखमींना बाहेर काढले.यावेळी डॉक्टरांना बोलावले असता डॉक्टरांनी गंभीर जखमी झालेली सुवर्णा अशोक मुकणे वय वर्षे ८ ही मृत झाल्याचे सांगितले तसेच ईतर जखमी झालेले संतोष मुकणे,तन्वी मुकणे,तुषार मुकणे यांना उपचारासाठी माणगाव उपजिल्हा रुग्णालयात येथे हलविण्यात आले आहे.