Type Here to Get Search Results !

घोडेघुम येथील हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यास तळा पोलिसांना यश


घोडेघुम येथील हरवलेल्या व्यक्तीला शोधण्यास तळा पोलिसांना यश


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा



घोडेघूम येथील हरवलेल्या व्यक्तीस शोधण्यात तळा पोलिसांना यश आले आहे. माणगाव तालुक्यातील घोडेघूम येथील तुकाराम जाणू गावडे वय वर्षे (७०) हे गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता होते.दि.२ एप्रिल रोजी तळा तालुक्यातील मौजे बोरघर येथील बस स्टॉपवर एक अनोळखी इसम हा गेली तीन ते चार दिवस आजारी अवस्थेत असल्याची माहिती बोरघर येथील रहिवासी दिपक रसाळ यांनी तळा पोलीस ठाण्यात दिली.यावेळी कर्तव्यावर असलेले पो. ह.संजय शिंदे,गणेश जगताप व गोपनीय पोलीस शिपाई तिडके यांनी त्वरित बोरघर येथे जाऊन सदर व्यक्तीची विचारपूस केली असता ती व्यक्ती घोडेघुम येथून बेपत्ता झाली असल्याचे त्यांना समजले.त्यांनी सदर व्यक्तीला घोडेघुम येथे त्यांच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहचविले.यावेळी गेल्या दहा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या आपल्या माणसाला सुखरूप घरी पोहचविल्याबद्दल गावडे कुटुंबांनी संजय शिंदे,गणेश जगताप व तिडके या तिन्ही पोलिसांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test