Type Here to Get Search Results !

खासदार राजन विचारे यांची प्रमुख उपस्थितीत पोलादपूर तालुक्यात शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ


खासदार राजन विचारे यांची प्रमुख उपस्थिती पोलादपूर तालुक्यात शिवसेना संपर्क अभियानाचा शुभारंभ


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


              गाव तिथे शाखा घर तिथे शिवसैनिक माननीय खासदार राजन विचारे महाड पोलादपूर माणगाव माननीय आमदार भरतशेठ गोगावले रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांच्या नेतृत्वाखाली महाड विधानसभा मतदारसंघातील संपर्क अभियानाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पोलादपूर तालुक्यात बुधवार दिनांक 25 मे रोजी सुरुवात करण्यात आली.
            शिव संपर्क अभियानासाठी उपस्थित संपर्कप्रमुख सदानंद थरवळ, जिल्हायुवा अधिकारी विकास शेठ गोगावले जिल्हाप्रमुख आणि नवगणे विधानसभा संपर्कप्रमुख सुभाष पवार पोलादपूर संपर्कप्रमुख उपतालुका प्रमुख शौकत भाई तार्लेकर तसेच शिवसेना युवासेना आजी माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी नगरसेवक, नगराध्यक्ष तालुकाप्रमुख जिल्हा परिषद सदस्य प्रमोद घोसाळकर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहिरे अनेक पदाधिकाऱ्यांकडून खासदार राजन विचारे यांचे स्वागत करण्यात आले. अनेक समस्या बद्दल चर्चा करण्यात आली.
            ‌‌ या शिव संपर्क अभियानादरम्यान वेगवेगळ्या विकास कामांचा आढावा घेण्यात आला पोलादपूर तालुक्यातील वेगवेगळी खेडेगावे जसे की तुर्भे कुडपण, लोहारे अशा अनेक ठिकाणी रस्ता दुरुस्ती तसेच पाणीपुरवठा अशा अनेक विकास कामांबद्दल आढावा घेण्यात आला. पोलादपूर तालुक्यातील समस्या जाणून त्यासाठी केलेले उपाय योजना याबद्दल माहिती देण्यात आली. तुर्भे खोंडा धरण कुडपण, गावातील रस्ता संबंधित निधी मंजूर करून कामाचा आढावा घेण्यात आला शिवसेना शिव संपर्क अभियानासाठी शिवसैनिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test