Type Here to Get Search Results !

मौजे-वेळास-आगर येथील समुद्र किनाऱ्यावर अत्यावश्यक असणाऱ्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याला तांत्रिक मंजूरी, सरपंच, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीला यश

मौजे-वेळास-आगर येथील समुद्र किनाऱ्यावर अत्यावश्यक असणाऱ्या धुप प्रतिबंधक बंधाऱ्याला तांत्रिक मंजूरी

सरपंच, ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या मागणीला यश

मौजे-वेळास-आगर पर्यटन क्षेत्र व्हावं,ग्रामस्थ व बेरोजगारांची मागणी


रायगड वेध संतोष शिलकर वेळास आगर


श्रीवर्धन तालुक्यातील मौजे-वेळास-आगरला अंदाजे ५१० मिटरचा सुंदर व स्वच्छ समुद्र किनारा लाभला आहे.मात्र उधाणाच्या पाण्याने होणारी धूप थांबविण्या साठी धुप प्रतिबंधक बंधारा आवश्यक असल्याची मागणी ग्रामपंचाय तीच्या वतीने होती.रायगड जिल्ह्याचे खासदार मा.सुनील तटकरे,पालकमंत्री अदितीताई तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने हा धूप प्रतिबंधक बंधारा मंजूर झाला.याची लांबी ५१० मीटर एवढी असून अंदाजे साडेतीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याचे समजते.

सदर धूप प्रतिबंधक बंधारा तांत्रिक मंजुरी व दिव्यांग ग्रामस्थ श्रीमती भागीर्थी चांगोजी अपराध या महिलेला घरकुल करीता प्रशासकीय मान्यता प्राप्त करुन देण्यात सरपंच अशितोष कृष्णा पाटील यांनी पाठपुरावा केला.

निसर्गाचं वरदान लाभलेल्या श्रीवर्धन तालुक्याला नयनरम्य सुंदर किनारा लाभला आहे.या मुळे श्रीवर्धन,हरिहरेश्ववर,दिवेआगर येथे येणाऱ्या पर्यटकांना येथील निसर्ग सौंदर्याने भुरळ घातली आहे. निळ्या शुभ्र फेसाळलेल्या लाटा, सफेद वाळूचा किनारा,शासनाच्या सामाजिक वणीकरण विभागाने व ग्रामपंचायतीने केलेली सुरुंची लागवड, किनाऱ्या लगत मालकी असलेल्या नारळी-फोपळीच्या हिरव्या गार नारळी,फोपळी बागांचा जणू पदर असलेल्या या वेळास-आगरच्या किनार पट्टीवर मोठया उधाणाच्या भरतीने या सुंदर किनारपट्टीची धूप होत चालली आहे.गेल्या काही वर्षात मुसळधार पावसात तीव्र प्रमाणात समुद्राच्या उसळत्या लाटांमुळे सागराने रौद्ररूप धारण केल्यामुळे या किनारपट्टीची चांगलीच धूप झाली आहे.त्यामुळे सामाजिक वणीकरण व ग्रामपंचायतीने लागवड केलेल्या सुरुंची मोठया प्रमाणात पडझड होत असते.या किनारपट्टीची धूप थांबविण्यासाठी राज्य शासनाने निधी उपलब्ध करून लवकरात लवकर या धूप प्रतिबंधक बांधाऱ्यांचे प्रत्यक्ष्यात काम सुरू व्हावे.जेणे करून हा किनारा सुरक्षित राहील.आणि वेळास-आगर गावाचा संभावित धोका टळेलं.                                      

 हाच वेळास-आगरचा देखणा समुद्र किनारा पर्यटकांना खुणावतोय,तो नकळत पर्यटकांना भुरळ घालतोय.म्हणुन वेळास-आगर हे पर्यटन क्षेत्र व्हावं.अशी विनंती महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्वव ठाकरे,पर्यटन विकास मंत्री आदित्य ठाकरे ,रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदार कार्यक्षम ना.अदिती तटकरे,कार्यसम्राट खासदार मा.सुनील तटकरे साहेब मौजे वेळास-आगर पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर व्हावं अशी ग्रामपंचायत व येथील बेरोजगार ग्रामस्थांची तसेच परिसरातील तमाम नागरिकांची मागणी आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test