Type Here to Get Search Results !

म्हसळ्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 28 प्रकरणे मंजूर


म्हसळ्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत 28 प्रकरणे मंजूर

● संगायो निराधार पेन्शन योजनेच्या लाभापासून कोणीही वंचित राहू नये - अध्यक्ष महेश शिर्के


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


                      म्हसळा तालुक्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक दिनांक 30/05/2022 रोजी तहसिलदार म्हसळा यांचे दालनात आयोजित करण्यात आली होती. 
                           संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना अंतर्गत महा ई सेवा केंद्रामार्फत ऑनलाईन व्दारे प्राप्त झालेले परिपूर्ण अर्जाची छाननी करणेत आली असून ते अर्ज मंजूरीसाठी समितीकडे सादर करणेत आले होते, यावेळी विविध योजनांचे एकुण 32 अर्ज प्राप्त झाले होते यांपैकी परिपूर्ण 28 अर्ज मंजूर करण्यात आले असून 04 अर्ज काही कारणास्तव नामंजूर करणेत आले.
  सभेदरम्यान संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण - 14 अर्ज, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना - 10 अर्ज, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना (अनुसूचित जाती) - 01 अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना - 02 अर्ज, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना - 01 अर्ज असे एकूण 28 अर्ज मंजूर करण्यात आले असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष महेश शिर्के यांनी दिली आहे. तसेच तालुक्यातील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांनी संगायो निराधार पेन्शन योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी गावागावात सर्व माध्यमातून अधिकपणे प्रचार व प्रसार करण्यात येईल असे अध्यक्ष महेश शिर्के यांनी सांगितले.
    तालुक्यातील सुरई, गोंडघर, म्हसळा शहर, रुद्रवट, काळसुरी, गायरोणे, सकलप, खरसई, पाभरे, देवघर कोंड, खामगाव, तोंडसुरे, साळवींडे, मेंदडी, मांदाटणे, घोणसे, निगडी, बंडवाडी, कणघर, आगरवाडा, चिरगाव, सांगवड, या गावांतील लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज सादर केले होते.
                  संगायो योजने अंतर्गत प्राप्त झालेले लाभार्थी यांचे अर्ज मंजूर करण्यात येऊन सदर लाभार्थी यांना माहे जून २०२२ पासून शासन नियमानुसार देय होणारे अनुदानाचे लाभ देणेत यावेत असे अध्यक्ष यांनी निर्देश दिले. तसेच तहसिलदार म्हसळा, गटविकास अधिकारी म्हसळा यांनी त्यांचे अधिनिस्त असलेले सर्व ग्रामसेवक यांना त्यांचे ग्रामपंचायत क्षेत्रात संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इत्यादी योजनांचे निकषांची पूर्तता होत असलेले परंतु अद्याप पर्यंत त्यांना त्या योजनांबाबत माहिती नसल्याने ते अर्ज करु शकलेले नाहीत अशा लाभार्थी यांना तहसिल कार्यालयाकडे अर्ज सादर करणेबाबत सुचना देणेत येतील असे सांगितले. उपस्थित सर्वांचे श्री.अमर ठमके, संगायो महसुल सहाय्यक यांनी आभार मानले.
  आयोजित बैठकीस संगायो समिती अध्यक्ष महेश शिर्के, तहसिलदार तथा सदस्य सचिव संगायो समिती समीर घारे, नायब तहसिलदार डी.जे.पाटील, संगायो समिती सदस्य सुनिल लाखण, सदस्या निशा पाटील, सदस्य मोरेश्वर पाटील, सदस्य महादेव भिकू पाटील, सदस्य समीर काळोखे, सांगायो महसूल सहाय्यक अमर ठमके उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test