पोलादपूर एसटी स्टँड वर तीन अज्ञातांकडून सोन्याच्या दागिन्यांची लूट
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
मंगळवार दिनांक १० मे रोजी पहाटे ९ वाजण्याच्या सुमारास पोलादपूर एसटी स्टँड येथे तीन इसमांनी सोन्याच्या दागिन्यांची लुटल्या आणि एकच खळबळ उडाली.
पोलादपूर एसटी स्टँड मध्ये श्रीमती सुनंदा दिनकर सकपाळ वय ६५ पोलादपूर ते बोरावळे बसमध्ये चढत असताना तीन इसमाने अचानक येऊन त्यांच्या हातातील बांगड्या हिसकावून घेतल्या व तेथून पळ काढला सुदैवाने सुनंदा यांना मोठ्या प्रमाणात हानी न होता काही प्रमाणात दुखापत झाली.
तीन अनोळखी इसमांचा शोध सुरू असून पुढील तपास सहाय्यक फौजदार भोसले हे करीत आहेत हातातील सोन्याच्या बांगड्या आरोपी यांनी कट करून स्वतःच्या फायद्या करिता संमतीशिवाय लबाडीने चोरल्या म्हणून कलम ३७९ ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीला पकडण्यात करता पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.