खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते रायगड तलाठी भवन इमारतीचे भूमिपूजन
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
रायगड जिल्हा तलाठी भवन इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्याचे आयोजन सोमवार रोजी करण्यात आले. यासाठी आमदार अनिकेत तटकरे यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधीतून काम करण्यात येणार आहे. या जिल्हा तलाठी भवन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार सुनिल तटकरे म्हणाले की
महसूल विभागाचा कणा म्हणुन तलाठी यांच्याकडे पाहीले जाते,लोकांचा विश्वास तलाठी कार्यावर असते. महसूल मालमत्तेची जबाबदारी तलाठ्यांवर असते.यामुळे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या जवळ राज्यव्यापी बैठक करण्यात येईल व रखडलेली काम पुर्ण करण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही यावेळी खासदार सुनिल तटकरे यांनी केले. या कामासाठी लागल्यास खासदार निधीतून ५० लाख देण्यात येतील असे ही खासदार तटकरे यांनी सांगितले.
यावेळी माजी तहसिलदार बाबूराव निंबाळकर, तालुकाध्यक्ष दयानंद भगत,नगरसेविका वसुधा पाटिल,विकास म्हात्रे तसेच रायगड कोकण विभागीय अध्यक्ष म्हणून निवड झाल्याने रायगड जिल्हा तलाठी संघ अध्यक्ष संतोष जांभळे याचे अभिनंदन खासदार सुनिल तटकरे यांनी केले. यावेळी रायगड जिल्हयातील तलाठी सर्कल, कोतवाल उपस्थित होते.