कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्ट्याचे कवी संमेलन उत्साहात साजरा
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
उरणमध्ये प्रत्येक महिन्याच्या 17 तारखेला उरण शहरातील विमला तलाव(गार्डन )येथे कोकण मराठी साहित्य परिषद व मधुबन कट्ट्याचे कविसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. हे कवी संमेलन ज्येष्ठ नागरिकांसाठी पर्वणीच असते. यावेळी दिनांक 17/5/2022 रोजी विमला तलाव येथील गार्डन मधील कवी संमेलनात ज्येष्ठ नागरिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळाराम पाटील यांनी विचार मांडले.कविसंमेलन आणि जीवनगौरव असे दोन कार्यक्रम घेण्यात आले . जीवन थळी आणि मारुती तांबे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सूत्रसंचालन रंजना केणी यांनी केले. हे 79 वे कविसंमेलन अत्यंत उत्साहात पार पडले.
या कविसंमेलनात रायगडभूषण प्रा.एल.बी. पाटील,किशोर म्हात्रे,मच्छिंद्र म्हात्रे, भगवान पोसू, संग्राम तोगरे,अरुण म्हात्रे, वसंत राऊत, अमोल पाटील इत्यादींचे कविता वाचन झाले. यावेळी संजय केणी, सूर्यकांत दांडेकर, चंद्रकांत मुकादम, अनंत पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.