पोलादपूर तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय लोहारा येथे व्यक्तीमत्त्व विकास शिबीर संपन्न
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
मुलांनी एकत्र यावे त्यांच्यातील संवाद वाढावा तसेच त्यांच्यातील सुप्तगुणांना वाव मिळावा यासाठी पोलादपूर तालुक्यातील साने गुरुजी विद्यालय लोहारा येथे व्यक्तिमत्त्व विकास शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शनिवार दिनांक 30 एप्रिल रोजी या शिबिराला सुरुवात करण्यात आली हे शिबिर तीन दिवसांचे होते.
व्यक्तिमत्व विकास शिबिरामध्ये शिक्षक विद्यार्थी यांच्यात मध्ये चांगल्या प्रकारे संवाद व्हावा गेली दोन वर्षे शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थी त्यांच्या घरी राहून शिक्षण घेत होते त्यामुळे सामाजिक बांधिलकी संपर्क फार कमी झाला होता परंतु आता शाळा पुन्हा सुरू झाली आहे त्यामुळे विद्यालय आणि व्यक्तिमत्व विकास शिबिराचे आयोजन केले होते यामध्ये वेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते.
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शाहीर म्हात्रे सर यांचे गाणे प्राचार्य समीर बुटाला प्राध्यापक सुधारणांमुळे महाविद्यालय यांनी तापमान वाढ या विषयावर मुलांना खूप मौल्यवान मार्गदर्शन केले कशा प्रकारे तापमान वाढ ही कमी करता येऊ शकते तापमान वाढीची कारणे हे देखील त्यांनी मुलांना समजावून सांगितले डॉक्टर नितीन सर यांनी नेत्रदान याविषयी मुलांना मार्गदर्शन केले तसेच संगीत व चित्रकला याचेही प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात आले मुलांना शिबिरात द्वारे वेगवेगळ्या प्रकारचे शिक्षणाबद्दल मार्गदर्शन मिळाले मुलांकडून चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला होता अशा प्रकारे मंगळवार दिनांक 3 मे रोजी व्यक्तिमत्व विकास शिबिर संपन्न झाले.