तळघर येथे लक्ष्मीनारायण पालखी महोत्सव उत्साहात साजरा.
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा तालुक्यातील तळघर येथे दि.१५ मे रोजी लक्ष्मीनारायण पालखी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये लक्ष्मीनारायण अभिषेक सोहळा,सत्यनारायणाची महापूजा,पालखी मिरवणूक,स्वागत समारंभ तसेच महाप्रसादाचे देखील अयोजन करण्यात आले होते. तळघर ग्रामस्थांकडून गेली कित्येक वर्षे लक्ष्मीनारायण पालखी महोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत असून यंदाचे हे २३ वे वर्ष आहे..गेली दोन वर्षे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा उत्सव साजरा करण्यात आला नव्हता परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारचे कोरोना प्रतिबंध नियम लागू नसल्याने मोठ्या उत्साहात लक्ष्मीनारायण पालखी महोत्सव साजरा करण्यात आला. रात्री संगीत भजनाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी तळघर ग्रामस्थ मंडळ,मुंबईकर मंडळ व उत्कर्ष महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.