नगर परिषद, नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित.
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
महाराष्ट्रातील नगरपालिका नगरपंचायत मधील तमाम कर्मचाऱ्यांनी आपल्या न्याय हक्काच्या मागण्यांकरिता दिनांक 1 मे 2022 पासून बेमुदत संप पुकारला होता त्यात मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला त्या सर्व कर्मचाऱ्यांचे आभार मानत दिनांक 3 मे 2022 पासून सदर आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य नगर परिषद, नगर पंचायत कर्मचारी / संवर्ग कर्मचारी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी केली.
दिनांक 2 मे 2022 रोजी मंत्रालयातून आलेल्या बोलावण्या नुसार मंत्रालयात जाऊन प्रभारी प्रधान सचिव, अवर सचिव मा. सहस्त्रबुद्धे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेरावजी यांचे पी .एस. खदगावकर, आयुक्त तथा संचालक , नगरपालिका प्रशासन संचालनालय कार्यालयातील अधिकारी यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेनुसार व संघटनेच्या मागण्यांसंदर्भात वित्त विभागाशि संबंधित, नगर विकास विभागाचे संबंधित व इतर विभागाचे संबंधित मागण्यांच्या फाइल्स सकारात्मक रित्या प्रस्तावित केलेल्या दिसल्याने व संघटनेच्या मागण्या मार्गी लागत असल्याने तसेच दिनांक 4 मे 2022 व 5 मे 2022 रोजी नगर विकास मंत्री मा.ना.एकनाथ शिंदे भेट देणार असल्याने व तदनंतर बैठक देणार असल्याने तसेच उपसचिव नगर विकास विभाग यांचे पत्र अवलोकन करता , महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीचा विचार करता तसेच शासनाने संप स्थगित करण्याचे आव्हान केल्याने, शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने कृती समितीने आज झालेल्या बैठकीत असा निर्णय घेतला आहे की दिनांक 1 मे 2022 रोजी पासून पुकारलेला बेमुदत संप दिनांक 3 मे 2022 च्या मध्यरात्रीपासून स्थगित करण्यात येत असून संघटनेच्यावतीने कर्मचार्यांच्या मागण्या करता सतत पाठपुरावा करण्यात येईल.अशी माहिती सुरेश पोसतांडेल,प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी/संवर्ग कर्मचारी संघटना यांनी दिली आहे.