Type Here to Get Search Results !

महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी


महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी 


रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


जगातील पहिले महात्मा, लोकशाहीचे आद्य जनक, जगात सर्वप्रथम शिवानुभव मंटप नावाने लोकशाहीची संसद स्थापन करणारे,सर्वधर्मसमभाव जोपासणारे, महान क्रांतिकारक, वीरशैव-लिंगायत धर्माचे प्रचारक प्रसारक, क्रांतीसुर्य जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर यांचे दरवर्षी अक्षय तृतियेच्या शुभमुहूर्तावर भारतात सर्वत्र मोठ्या उत्साहात जयंती साजरी केली जाते.
समाजात समानता न्याय बंधुता आदी मूल्ये रुजविण्यात महात्मा बसवेश्वर यांचे खूप मोठे योगदान आहे. सर्व जाती धर्मातील लोकांना त्यांनी समानतेची,प्रेमाची, बंधुताची शिकवण दिली. सर्व जाती धर्मातील नागरिक त्यांचे शिष्य होते.त्यामुळे त्यांची जयंती भारतात सर्वत्र शासकीय, निमशासकीय कार्यालये, महामंडळ आदी ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. उरण तालुक्यातही तहसील कार्यालय, नगर परिषद, पंचायत समिती आदी शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर यांची 891 वी जयंती साजरी करण्यात आली.
तहसील कार्यालयात नायब तहसीलदार नरेश पेढवी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून वंदन केले. पंचायत समिती मध्ये गट विकास अधिकारी नीलम गाडे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केले. तर उरण नगर परिषद कार्यालयात सहाय्यक कर्मचारी धनंजय आंबरे, संदेश पवार यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार,श्रीफळ अर्पण करून त्यांच्या कार्याचे, विचारांचे समरण करत महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केली.वीरशैव लिंगायत समाजाच्या न्याय हक्कासाठी लढणारी एकमेक व आक्रमक संघटना म्हणून शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटना ओळखली जाते.शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेच्या पाठपुराव्यामुळे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मनोहर धोंडे, मनिष पंधाडे, रुपेश होनराव, नारायण कंकणवाडी,शिवा बिराजदार,विनायक म्हमाने यांच्या मार्गदर्शनाखाली उरण मधील पदाधिकारी विठ्ठल ममताबादे,बालाजी हेड्डे यांच्या विशेष प्रयत्नातून उरण तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात येऊ लागली.महात्मा बसवेश्वर जयंती साजरी केल्याने सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी वर्गांचे शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे सोशल मीडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष विठ्ठल ममताबादे यांनी आभार मानले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test