आडनाले येथील मुंबईकर तरुणांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश
रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा
तळा तालुक्यातील अडनाले येथील मुंबईकर तरुणांनी खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत शनिवार दि.१४ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून करण्यात येत असलेल्या विकासकामांनी प्रेरित होऊन आपल्या गावातही विकासाची गंगा यावी या उद्देशाने अजित काप, पांडुरंग लक्ष्मण मोरे, सुनील प्रकाश रामाणे, योगेश आंबेकर,सुरेश पतारी ,नरेश आंबेकर नरेश मोरे ,सुरेश आंबेकर या गावातील मुंबईकर तरुणांनी राष्ट्रवादीचे तरुण युवक कार्यकर्ते देविदास रामाणे यांच्या नेतृत्वाखाली खा.सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे,सभापती अक्षरा कदम,तालुका अध्यक्ष नाना भौड,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे,कैलास पायगुडे, उत्तम जाधव,सचिन कदम, आदी मान्यवर उपस्थित होते.