Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीत बेकायदेशीर दारूसाठा जप्त


पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीत बेकायदेशीर दारूसाठा जप्त


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


                पोलादपूर तालुक्यातील कापडे गाव हद्दीत पोलादपूर पोलीस स्थानकाच्या सतर्कतेमुळे बेकायदेशीर दारूसाठा जप्त करण्यात आला.
           29 मे रविवार रोजी सायंकाळी ७:३० च्या सुमारास कापडे गाव हद्दीत पेट्रोल पंपा समोरून जात असताना पोलादपूर पोलीस हवालदार श्री आशिष गणपत नटे यांना संशय आल्याने संतोष दिनकर दाभेकर वय ४९ वर्ष राहणार किनेश्वर पाऊस यांची चौकशी केली असता त्यांच्याकडे विनापरवाना बेकायदेशीर रीत्या ७२० रुपये किमतीची जी एम देशी संत्रा नावाच्या १८० एम एल एकूण बारा सीलबंद बाटल्या कब्जात बाळगल्याच्या स्थितीत आढळून आल्या.
           महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (खंड) प्रमाणे पोलादपूर पोलिस स्थानकामध्ये संतोष दिनकर दाभेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पी आर जाधव यांनी मार्गदर्शन केले सहाय्यक फौजदार तेजी पवार यांनी घटनास्थळी भेट दिली व पुढील तपास कदम पोलिस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test