Type Here to Get Search Results !

मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 चे काम यंदाही अपूर्ण राहण्याची शक्यता

मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 चे काम यंदाही अपूर्ण राहण्याची शक्यता

रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


                       पोलादपूर तालुक्यात गुरुवार दिनांक १९ एप्रिल रोजी सौम्या स्वरूपाचा पाऊस झाला या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ दुरावस्था झाली.
              पोलादपूर तालुक्यामधे गेली तीन वर्ष महामार्गाचे काम हे सुरूच आहे परंतु अद्याप पूर्ण झालेले नाही अनेक ठिकाणी महामार्गाचे काम हे अपूर्णच आहे तसेच पर्यायी मार्ग देखील अरुंद व साध्या पद्धतीचा आहे त्यामुळे एकावेळी एकच अवजड वाहन जाण्याची त्या पर्यायी मार्गाची क्षमता असल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना देखील वाहनचालकांना करावा लागत आहे.
                 पोलादपूर मधील भुयारी मार्ग करण्याचे कामही सुरू आहे परंतु गुरुवारी झालेल्या पावसामुळे कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे व पर्यायी मार्ग वाहतुकीसाठी देण्यात आला होता तो अरुंद असल्याने एकावेळी दोन आणे जाणे शक्य नसल्याने वाहतूक कोंडीही मोठ्या प्रमाणात होत आहे गुरुवारी सायंकाळी झालेल्या या पावसामुळे त्या पर्यायी मार्गाची देखील दुरवस्था झाली आहे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत व मार्गालगत असलेल्या दुकान हॉटेलचे नाही वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे वारंवार होणाऱ्या समस्यांकडे संबंधित कंपनी हे दुर्लक्षित करीत आहे कामांमध्ये पडलेला यामुळे महामार्गाचे काम अपूर्ण राहण्याची शक्यता आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test