हतबल झालेल्या बळीराजाला वारकरी संप्रदायाचे पाठबळ
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
वणव्यामुळे अनेकदा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होते तसेच झाडे वनस्पती व जनावर यांनाही मोठ्या प्रमाणात हानी पोहोचते त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर ही पडतो कारण त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हे पूर्णतः अवलंबून असते.
पोलादपूर तालुक्यातील पांगळोली गावातील शेतकरी असलेले परशुराम उपाळे यांच्या गुरांच्या गोट्याला वणव्यामुळे गोठ्यातील १ गाईचा होरपळून मृत्यू झाला व इतर २ म्हशी व गाय गंभीर भाजल्या होत्या परशुराम उपाळे गरीब शेतमजूर असून पाळीव जनावरांवर त्यांची उपजीविका ही पूर्णपणे अवलंबून असते.
परशुराम उपाळे यांच्या वणव्यामुळे झालेला अतोनात नुकसान पाहता त्यांच्या आर्थिक व मानसिक आधार हा मोरे माऊली वारकरी संप्रदायातील सर्व वारकऱ्यांनी शक्य होईल तितक्या आर्थिक सहायता केले पुन्हा एकदा त्यांनी आपला उदरनिर्वाहाचे साधन निर्माण करावे त्याचे पुनर्वसन करावे व गंभीररीत्या भाजलेल्या व्यवस्थित उपचार व्हावेत यासाठी मदत व्हावी म्हणून मोरे माऊली संप्रदायातील वारकरी मंडळींनी त्यांना आर्थिक सहायता केली व मानसिक आधारही दिला एकत्र येऊन वारकरी संप्रदायाने माणूस याचे उत्तम उदाहरण ही दाखवले.