Type Here to Get Search Results !

रायगड जिल्यातील तळा तालुक्यात बनवली इलेक्ट्रिक जीप


रायगड जिल्यातील तळा तालुक्यात बनवली इलेक्ट्रिक जीप


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा तालुक्यातील तळा शहरात सध्या एकच चर्चा आहे ती म्हणजे इलेक्ट्रिक जीप ची.शहरातील विराज टिळक याने चक्क ७०% टाकाऊ वस्तू पासून इलेक्ट्रिक जीप बनवली आहे. ही पूर्णपणे तळा येथे डिझाईन करण्यात आली असून तिच्या चासी पासून कलर, आणि तिची सजावट, पेंटिंग देखील एकच ठिकाणी घरीच करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही जीप बनवण्यासाठी वेल्डिंग मशीन, ड्रिल मशीन, कटर आणि रिबेट मशीन वापरण्यात आलंय. अवघी चार अवजारे वापरून ही जीप बनवण्यात आली आहे. 

ह्या जीप मध्ये चार बॅटरी आहेत आणि एक इलेक्ट्रिक मोटर आहे. हिला बनवण्या साठी साधारण दीड लाख रुपये खर्च आला असून एकदा चार्ज केली कि ७५ ते ८० किमी पर्यंत चालते.आणि मोठ्या बॅटरीज असतील तर १०० किमी पेक्षाही जास्त चालते. साधारण पणे चार ते पाच तास बॅटरी चार्जिंग ला जातात. ३० ते ३५ रुपयात ८० किमी प्रवास करते. विरोध कमी व्हावा आणि जुन्या जीपला शोभतील म्हणून मोटारसायकचे टायर वापरले आहेत. ह्या जीपचा स्पीड ३० ला लॉक केला आहे. मागे पुढे पाटे लावून सस्पेन्शन देखील उत्तम केले आहे तसेच हँडब्रेक, उताराला अँटीलॉक सिस्टम देखील आहे. हेडलाईट, पार्किंग लाईट, इंडिकेटर, हॉर्न देखील आहे खराबी झाली तर फ्युज प्रोटेक्शन आहे. शिवाय ह्या इलेक्ट्रिक जीप गाडी मुळे प्रदूषण देखील होत नाही.

रोजगारासाठी अश्या प्रकारचे उपक्रम शासनाने हाती घेतले तर रोजगार निर्मिती होऊ शकते रिवर्स मायग्रेशन होऊ शकते. तरुणांच्या हाताला काम मिळू शकते. शासनाने याचा विचार नक्की करावा ही विनंती.
( विराज टिळक इलेक्ट्रिक जीप निर्माते)

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test