गोशीन रियु कराटेचे जिल्हा स्तरीय स्पर्धेमध्ये घवघवीत यश
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
अलिबाग येथे पहिली कराटे डो ऑर्गनायजेशन जिल्हास्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये गोशीन रियू च्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले. विविध वजनी गटामध्ये (काता व कुमिते प्रकारात )मुले स्पर्धेमध्ये सहभागी झाली होती. त्यामध्ये अभिज्ञा पाटील गोल्ड मेडल,नेत्रा गावंड गोल्ड मेडल,नेहा पाटील गोल्ड ब्रॉन्झ, रितिका जोगदंड 2 ब्रॉन्झ, कक्षा म्हात्रे गोल्ड मेडल समिक्षा पाटील गोल्ड गोल्ड मेडल, तमन्ना गावंड सिल्वर ब्रॉन्झ, विनया पाटील गोल्ड ब्रॉन्झ, मानसी ठाकूर गोल्ड, शुभम ठाकूर 2 गोल्ड, परेश पावस्कर सिल्वर ब्रॉन्झ,, रोहित घरात गोल्ड, अर्णव पाटील सिल्वर ब्रॉन्झ, श्लोक ठाकूर ब्रॉन्झ गोल्ड,अनिश पाटील गोल्ड,वैदेही घरत गोल्ड, योग म्हात्रे सिल्वर ब्रॉन्झ,अमिषा घरत सिल्वर ब्रॉन्झ,अमिता घरत गोल्ड सिल्वर, अमर घरत गोल्ड, ब्रॉन्झ, अंश म्हात्रे सिल्वर, सुजित पाटील गोल्ड ,सेजल पाटील गोल्ड ब्रॉन्झ, करण पाटील सिल्वर ब्रॉन्झ, स्पर्श ठाकूर सिल्वर,पूर्वा पाटील सिल्वर ब्रॉन्झ ही पदके पटकविली.
या मुलांची निवड पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये झाल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.ह्या मुलांना मार्गदर्शन गोपाळ म्हात्रे, राकेश म्हात्रे यांनी केले.या स्पर्धेमध्ये एकूण 250 हून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते.
ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या स्पर्धेचे प्रेसिडेंट मातीवानंद सर राहुल तावडे , सचिव राजू कोळी, खजिनदार अतुल बोरा, उपाध्यक्ष अतुल पोतदार ,सभासद संतोष मोकळ, राजेश कोळी, शुभम म्हात्रे, राजेश कोळी, कंकेश गावंड आदींनी विशेष मेहनत घेतली.