श्री जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीने नागोठणेकरांना आरोग्य सेवा दिली हे कौतुकास्पद : किशोर जैन
किशोर जैन यांच्या हस्ते आरोग्य तपासणी शिबिराचे उदघाटन : ७० रुग्णांनी घेतला लाभ
रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा
रायगड जिल्हा सह नागोठणे ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना भारतीय एजुकेशन सोसायटीने उच्चशिक्षणाची दालणे उभी करून विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण दिल्यामुळे नामांकित कंपनीत ते विद्यार्थी नोकरी देखील करीत आहेत हा मला अभिमान असुन भाएसोच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी नवीन कोर्स आणले जात असतात. जनतेच्या आरोग्य तपासणीसाठी अतिशय महत्वाचा असलेला बीएससी डीएमएलटी ह्या पॅथॉलॉजी शिक्षणाची व्यवस्था भाएसो च्या माध्यमातून यावर्षी करण्यात आली असल्याचे सांगुन भाएसो मध्ये बी. फार्मसि या पदवीधर शिक्षणाची देखील व्यवस्था करण्यात आली असुन या सुवर्ण संधीचा रायगडसह नागोठणे विभागातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करून शिवसेना नेते भाएसोचे संस्थापक अध्यक्ष किशोर जैन यांनी भाएसो मध्ये ग्रामीण भागातील मुलींसाठी नर्सिंग कोर्स सुद्धा लवकरच उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती देत श्री जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीने नागोठणेकरांना उत्तम प्रकारे आरोग्य सेवा दिली हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार किशोर जैन यांनी काढले.नागोठणे येथील श्री शिव गणेश सभागृहात आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिरात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक टिळक खाडे यांनी केले. दरम्यान या आरोग्य शिबिरात नागोठणे परिसरातील सुमारे ७० रुग्णांनी लाभ घेतला. यावेळी या रुग्णांची उपस्थित डॉक्टरांनी तपासणी करून योग्य सल्ला देत औषधे दिली.
नागोठणे येथील प्रसिद्ध असलेली श्री जोगेश्वरी पॅथॉलॉजी लॅबोरेटरीचे संचालक प्रकाश मेस्त्री, नागोठणे येथील क्रियाशील पत्रकार मंगेश पत्की व महेंद्र म्हात्रे यांनी सामाजिक बांधिलकीच्या उद्देशाने माणुसकी प्रतिष्ठान, रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने नागोठणे येथील श्री शिवगणेश सभागृहात रविवार दि.१५ मे रोजी आयोजित मोफत आरोग्य तपासणी, नेत्र, दंत, मधुमेह तपासणी शिबिराचे उदघाटन किशोर जैन यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नागोठणे माजी सरपंच ज्येष्ठ नागरिक गजानन रावकर, राष्ट्रवादीचे नेते माजी सरपंच विलास चौलकर, नागोठणे उपसरपंच मोहन नागोठणेकर, माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान, राजिपचे अधिकारी जयवंत गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जैन, ज्ञानेश्वर साळुंखे, शिवसेना शाखाप्रमुख धनंजय जगताप, माजी शाखाप्रमुख कीर्तिकुमार कळस, लायन्स क्लबचे एमजेएफ लायन विवेक सुभेकर, लायन दौलत मोदी, डॉ. रोहिदास शेळके, डॉ. सुनील पाटील, डॉ. मनिष वैरागी, डॉ. नरेश सोष्टे, डॉ. अभिषेक शहासने, डॉ. पुरूषोत्तम भोईर आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वैद्यकिय प्रवेश परीक्षेत ९९.३० टक्के गुण मिळवून मुंबई येथील नायर हॉस्पिटल मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत असलेली संयुजा टिळक खाडे हिचा शिवसेना नेते किशोर जैन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आरोग्य तपासणी शिबीर यशस्वी करण्यासाठी माणुसकी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजाराम हुलवान यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा शाखेचे अध्यक्ष महेंद्र भातीकरे, सचिव चंद्रशेखर सावंत, महिला आघाडी विभा भातीकरे, सदस्य गिरीश मढवी, नागोठण्यातील अंकिता यादव, अपूर्वा मालुसरे आदींनी विशेष मेहनत घेतली.