Type Here to Get Search Results !

भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नावाने सांस्कृतिक भवन बांधुन मिळण्याची मागणी● बौध्दजन पंचायत समिती ता.शाखा म्हसळाचे पदाधिकारी यांनी घेतली खासदार सुनिल तटकरे यांची भेट


भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर नावाने सांस्कृतिक भवन बांधुन मिळण्याची मागणी

● बौध्दजन पंचायत समिती ता.शाखा म्हसळाचे पदाधिकारी यांनी घेतली खासदार सुनिल तटकरे यांची भेट


रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा


   बौध्दजन पंचायत समिती ता.शाखा म्हसळा यांच्या प्रयत्नातून व महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेले प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने सांस्कृतिक भवन बांधुन मिळणार आहे. ही योजना तालुका शाखा म्हसळा यांनी राबवण्याचे ठरीवले असून रविवारी संबंधित जागेचे कागदपत्र रायगड जिल्ह्याचे खासदार सुनिल तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट घेऊन व चर्चा करुन कागदपत्रे सुपूर्द केली. तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.१ दहा गाव ग्रुप कणघर विभाग येथे असलेल्या शाखेचे कार्यालयात जाणेसाठी पक्का रस्ता नसल्या कारणाने वरिल शाखेचे पदाधिकारी तसेच बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.१ दहा गाव ग्रुपचे अध्यक्ष यशवंत विष्णु सुर्वे व पंचशील सेवा मंडळ कणघर ग्रामस्थ (मुंबई) यांच्या समवेत कणघर बौद्धवाडी रस्त्या करिता मोठ्या प्रमाणात निधी मिळावा तसेच सकलप येथील विकास कामे व्हावीत यासाठी निवेदन देण्यात आले. तसेच यावेळी सचिव संदिप साळवी यांनी खामगाव बौद्धवाडी येथे अंतर्गत रस्ता आणि सभागृह दुरुस्ती करून मिळावे अशी मागणी खासदार सुनिल तटकरे यांचेकडे केली. यावेळी म्हसळा तालुक्याच्या ठिकाणी भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नावाने सांस्कृतिक भवन बांधणे साठी आवश्यक ते निधीची उपलब्धता करून देण्यात येईल व याकामी सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल असे खासदार सुनिल तटकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आश्वाशीत केले.

यावेळी रायगड जिल्हा कृषि व पशुसंवर्धन समिती माजी सभापती बबन मनवे यांचे मार्गदर्शनाखाली व कणघर चे माजी सरपंच संतोष (नाना) सावंत यांचे सहकार्याने बौद्धजन पंचायत समिती ता.शाखा म्हसळा अध्यक्ष गजानन साळवी, उपाध्यक्ष अनंत बाळाराम पवार, कोषाध्यक्ष अशोक कृष्णा नाईक, कार्याध्यक्ष स.भी.पवार गुरुजी, माजी अध्यक्ष ३६ गाव शाखा म्हसळा आणि बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र.१ दहा गाव ग्रुप अध्यक्ष यशवंत विष्णु सुर्वे, पाच गाव शाखा सचिव संदिप साळवी हे तालुका शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test