Type Here to Get Search Results !

नागोठण्यातील बबन अलकुंटे यांचे अल्पशा आजाराने निधन


नागोठण्यातील बबन अलकुंटे यांचे अल्पशा आजाराने निधन


रायगड वेध अनिल पवार नागोठणे रोहा


 नागोठण्यातील प्रभू आळी भागातील रहिवासी व महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एस.टी) निवृत्त कर्मचारी बबन मसू अलकुंटे (वय ७५) यांचे शुक्रवार दि. १३ मे रोजी सकाळी ७.३० वा. नवी मुंबई येथील एम.जी.एम. रूग्णालयात निधन झाले. त्यांचे पार्थिव दुपारी घरी आणल्यानंतर नागोठण्यातील अनेक नागरिकांनी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. दिवंगत बबन अलकुंटे यांच्यावर येथील अंबा घाटावरील वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांचे नातेवाईक, विविध क्षेत्रातील नागरिक, समाज बांधव व प्रभू आळीतील नागरिक उपस्थित होते. कै. बबन अलकुंटे यांच्या पश्चात पत्नी, संजय व संतोष हे दोन विवाहित मुलगे, मुली, सुना, जावई, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. 

दिवंगत बबन अलकुंटे यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा आगारातील वर्कशाॅप मध्ये हेड मेकॅनिक म्हणून सुमारे ३८ वर्षे उत्तमप्रकारे सेवा केली होती. आपल्या शांत व प्रेमळ स्वभावामुळे त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. प्रभू आळीतील सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात त्यांचा सहभाग असायचा. त्यामुळेच मनमिळाऊ स्वभावाच्या बबन अलकुंटे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कै. बबन अलकुंटे यांचे दशक्रिया विधी रविवार २२ मे रोजी उध्दर येथे तर उत्तरकार्य बुधवार दि. २५ मे रोजी नागोठण्यातील प्रभू आळी येथील त्यांच्या राहत्या घरी होणार असल्याचे अलकुंटे कुटुंबियांकडून सांगण्यात आले. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test