चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न
रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण
छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप, ग्रामस्थ मंडळ चिरनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दिनांक 14/ 5/ 2022 रोजी उरण तालुक्यातील चिरनेर कातळपाडा येथे श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. संपूर्ण रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणारीत श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती हि एकमेव आहे .यंदा जयंतीचे हे 8 वे वर्ष आसल्याची माहीती संस्थेचे सचिव धिरज केणी यांनी दिली.
श्री छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती चिरनेर कातळपाडा येथे यावर्षी मोठ्या उत्साहात मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली.सकाळी 9 वा. श्री छत्रपती संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे इंदुमती कृष्णा नागा कडू यांच्या हस्ते पूजन, सकाळी 10 वा. तृप्ती महेश गणेश केणी व रेखा संकेत काळू म्हात्रे यांच्या शुभ हस्ते सत्यनारायनाची महापूजा करण्यात आली.
दुपारी 3:30 वा. शिवबंधू प्रेमी, समस्त शिवभक्त, ग्रामस्थ मंडळ चिरनेर उरण यांच्या उपस्थितीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी महिलांनी नववारी तर पुरूषांनी कूर्ता पायजमा व डोक्यावर फेटा असा पारंपारीक साज केला होता.तर स्थानीक महिला मूलींनी लेझीम वर ताल पकडला होता.पुष्प वृष्टी व टाळ मृदूंग व घोषणा देत पालखी काढण्यात आली होती.यावेळी कामगार नेते तथा काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत,माजी आमदार मनोहरशेठ भोईर,जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.
छावा प्रतिष्ठान चिरनेर, युद्धनौका ग्रुप,ग्रामस्थ मंडळ चिरनेर कातळपाडा, दुर्गा माता नवरात्र उत्सव चिरनेर, नवतरुण मित्र मंडळ कातळपाडा, अध्यात्मिक पौर्णिमा मंडळ चिरनेर भोम,अंकुश इलेव्हन, अर्जुन इलेव्हन, नरेंद्र महाराज सांप्रदाय चिरनेर, अभिनव मित्र मंडळ, निखिल स्पोर्ट्स, मंजित स्पोर्ट्स,छावा ग्रुप,सह्याद्री प्रतिष्ठान, आकृती कलामंच चिरनेर,ओम साई संवाद मंडळ चिरनेर, श्री छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक संस्था आदी विविध सामाजिक संस्थानी तसेच
छावा प्रतिष्ठान(युद्धनौका ग्रुप )चे संस्थापक अध्यक्ष सुभाष कडू, उत्सव अध्यक्ष -सचिन केणी, उत्सव महिला अध्यक्षा पूजा भोईर, उपाध्यक्ष सुशील म्हात्रे, कार्याध्यक्ष संतोष भोईर, सचिव धीरज केणी, सहकार्याध्यक्ष रमेश कडू,सहकार्याध्यक्ष तुषार केणी, सहखजिनदार - महेश केणी, संकेत म्हात्रे, सचिन कडू, ऋषिकेश कडू,पृथ्वीराज कडू, निहाल केणी आदी पदाधिकारी सदस्य यांनी श्री छत्रपती संभाजी महाराज जयंती यशस्वीपणे पार पाडण्यासाठी विशेष मेहनत घेतली.
सर्व शिवभक्तांनी पालखी सोहळ्यास उपस्थित राहून छत्रपती संभाजी महाराजांना मानवंदना दिली.व दिवसभरातील विविध धार्मिक कार्यक्रमांचा लाभ शिवभक्तांनी घेतला. कार्यक्रमाचे उत्तम आयोजन, नियोजन केल्याने शिवभक्तांनी, विविध सामाजिक संघटनानी सदर उपक्रमांचे, नियोजनाचे कौतुक केले.