Type Here to Get Search Results !

तळा शहरातील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत तर भाजप तर्फे साखळी उपोषण-प्रदेश सचिव रवि मुंढे


तळा शहरातील विविध प्रश्न मार्गी लागले नाहीत तर भाजप तर्फे साखळी उपोषण-प्रदेश सचिव रवि मुंढे.


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


तळा शहरातील असलेले विविध मूलभूत प्रश्न मार्गी लागले नाहीत तर भाजप पक्षाकडून साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचा ईशारा भाजप प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी दिला आहे. तळा शहरातील विविध समस्यांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते याप्रसंगी माजी नगराध्यक्षा रेश्मा मुंढे,तालुका अध्यक्ष ऍड निलेश रातवडकर,नगरसेवक रितेश मुंढे उपस्थित होते.यावेळी प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी सांगितले की तळा शहरासाठी पाण्याची योजना आम्ही जवळपास 99 टक्के पूर्ण केली होती परंतु त्यानंतर तळा नगरपंचायतीच्या निवडणुकीची आचारसंहिता लागली आणि त्या योजनेचे काम रखडले आणि केवल रवि मुंढेला या कामाचे श्रेय जाईल म्हणून ते पूर्ण करण्यासाठी आता सत्ताधाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे पावले उचलली जात नाहीत. तळा शहरात टीआयपीएल कडून करण्यात आलेल्या रस्त्यावर रात्रीच्या वेळेस गुरे बसत असल्यामुळे बऱ्याचदा अपघात झाले आहेत हे अपघात रोखता यावे यासाठी एम एस आर टी सी कडून सदर रस्त्यावर पथदिवे मी स्वतः लावून घेतले आहेत परंतु सत्ताधाऱ्यांकडुन त्याच बिल भरणे परवडणार नसल्याचे कारण सांगत ते पथदिवे अद्यापही सुरू करण्यात आलेले नाहीत.नगराध्यक्ष पदी विराजमान झालेल्या अस्मिता भोरावकर या नगरपंचायत कार्यालयात कधी थांबतच नाहीत माझी मुलगी त्यांची सही घ्यायला गेली असता नगराध्यक्षांचे पती त्या ठिकाणी बसलेले होते व त्यांनी माझ्या मुलीला नगराध्यक्षांची सही घेण्यासाठी घरी जावं लागेल असे सांगितले. त्यामुळे नगराध्यक्ष यांनी किमान ११ ते १ या वेळेत कार्यालयात उपस्थित रहायलाच हवे अन्यथा जमत नसेल तर खुर्ची सोडून द्यावी अशी टीकाही त्यांनी केली.यांसह महावितरण विभागाचा सध्या जो गलथान कारभार चालू आहे त्याविरोधात देखील आवाज उठवणार असून या सर्व गोष्टी वेळीच मार्गी लागल्या नाहीत तर येत्या आठ दिवसांत भाजप पक्षातर्फे साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचे प्रदेश सचिव रवि मुंढे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test