Type Here to Get Search Results !

पोलादपूर तालुक्यात पारंपारिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा


पोलादपूर तालुक्यात पारंपारिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरा


रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर


            इतिहासाला उजाळा देणारा छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य त्यांचे विचार याबद्दल माहिती मिळावी यासाठी शिवजयंती साजरी केली जाते. सोमवार दिनांक २ मे रोजी पोलादपूर तालुक्यात शिवजयंती साजरी करण्यात आली. मोठ्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते. पारंपारिक शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला आकर्षक सजावट करण्यात आली विद्युतरोषणाई करण्यात आली तसेच पूजन करण्यात आले.
               गेली दोन वर्ष कोरोनाविषाणूच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती मोजक्या लोकांच्या उपस्थितीत होते साधेपणाने साजरी करण्यात येत होती परंतु नियमांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आली आहे त्यामुळे सर्व शिवप्रेमी मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी केली.
         रायगडावर जाऊन शिवज्योत आणण्यात आली आकर्षक सजावट करण्यात आली यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ, अशा अनेक ऐतिहासिक वेशभूषा साकारल्या होत्या. रथातून मिरवणूक काढण्यात आली तसेच रायगडावर देखील मोठ्या प्रमाणात शिवभक्त हजारोच्या संख्येने उपस्थित होते सांगली, सातारा, कराड अशा अनेक जिल्ह्यांमधून शिवजयंतीसाठी शिवभक्त उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test