Type Here to Get Search Results !

तळा शहरातील पुसाटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


तळा शहरातील पुसाटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा शहरातील पुसाटी येथे शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली. दरवर्षी पुसाटी येथे शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात येतो परंतु गेली दोन वर्षे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे येथील ग्रामस्थांना हा उत्सव साजरा करता आला नव्हता.मात्र यावर्षी कोरोनाचे कोणतेही नियम लागू नसल्याने पुसाटी ग्रामस्थांकडून २ व ३ मे असे दोन दिवस शिवजयंती जल्लोषात साजरी करण्यात आली . यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. ज्यामध्ये महाराजांचा अभिषेक सोहळा, गारद(शिवगर्जना), शिवज्योत,महाप्रसाद, पालखी मिरवणूक, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनशैलीवर प्रश्नमंजुषा, सत्यनारायणाची महापूजा, लहान मुलांचे मैदानी खेळ, महिलांसाठी पैठणी खेळ, सत्कार समारंभ,सांस्कृतिक कार्यक्रम(नृत्यस्पर्धा) हे कार्यक्रम पार पडले. सायंकाळी तळा बाजारपेठेतून खालुबाजा व बेंजो च्या तालावर शिस्तबद्ध पद्धतीने महाराजांच्या पालखीची मिरवणूक काढण्यात आली.या मिरवणुकीत महाराजांचे प्रतिकात्मक रूप धारण केलेली व्यक्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती.याप्रसंगी पुसाटी ग्रामस्थ, महिला व मुंबईकर मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test