लोहारे बौद्धवाडी येथे बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरा
रायगड वेध ऋषाली पवार पोलादपूर
पोलादपूर तालुक्यातील लोहारे बौद्धवाडी क्रमांक दोन येथे सोमवार दिनांक 16 मे रोजी बौद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी माननीय आमदार भरतशेठ गोगावले आणि जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री चंद्रकांत कळंबे हे प्रमुख उपस्थित होते तसेच स्थानिक लोहारे गावचे सरपंच अनेक मानकरी तसेच स्थानिक गावातील लोक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते अनेक जण एका कामानिमित्त शहरांमध्ये जातात परंतु या कार्यक्रमानिमित्त सगळे एकत्र येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कोरोनाविषाणू च्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्ष अशा प्रकारचे कार्यक्रम करण्यास बंदी होती. परंतु आता काही प्रमाणात प्रमाणामध्ये शिथिलता आली आहे त्यामुळे कार्यक्रमात मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते त्याच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसून येत होता.
बौद्ध पौर्णिमेनिमित्त अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी लहान मुलांचे विविध प्रकारचे खेळ तसेच ऑर्केस्ट्रा मनोरंजनासाठी वेगवेगळ्या प्रकारचे मनोरंजक खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सहभाग घेऊन अनेक संदेश देण्यात आली तसेच स्थानिक समस्यांवर चर्चा करण्यात आली हा कार्यक्रम दोन दिवसांचा होता बौद्ध पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मंगळवारी बौद्ध पौर्णिमा संपन्न झाली.