पेण मधील प्रसिद्ध महाकाली देवीचा वाढदिवस उत्साहात साजरा
रायगड वेध प्रशांत पोतदार पेण
पेण येथील त्वष्टा कासार ज्ञाती बांधवांचे पुरातन श्री. महाकाली मंदिर येथे देवीचा वाढदिवस वैशाख शुक्ल षष्ठी दिनांक ७ मे २०२२ रोजी सालाबाद प्रमाणे उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी मुंबई न्यासाचे विश्वस्त असणारे दिलीप हजारे सदस्य प्राची वडके,मिनल वडके,यांच्यासह वेगवेगळ्या विषयांमध्ये नेत्रदीपक यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पारंपारिक रितीने देवीचा अभिषेक व पूजा करण्यात येऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली.दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते तर सायंकाळी देवीची पालखी व जोगवा आदि कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
यात विशेष म्हणजे महिला वर्गांचा सहभाग मोठ्या संख्येने होता.हा सोहळा यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष ॲड.हेमंत विजय वडके आणि इतर पदाधिकारी समाज बांधव यांनी फार मोलाचे परिश्रम घेतले.
यावेळी सचिव दीपश्री पोटफोडे,उपाध्यक्ष तेजस समेळ, खजिनदार सागर हजारे,धनश्री समेळ, तन्हवी हजारे,हेमंत कवळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.