आम्ही गिरगावकर टीम राबवतेय 'रंग दे माझी शाळा' उपक्रम
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
महाराष्ट्रात ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळांचे रंगकाम तसेच प्रसाधन गृहाची डागडुजी आवश्यक असलेल्या शाळांची रंगरंगोटी करून त्या शाळांना बोलके स्वरूप प्राप्त करून देण्याचा शैक्षणिक यज्ञ आम्ही गिरगांवकर टीमच्या माध्यमातून सारस्वत बँकेच्या सहकार्याने सुरू करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त स्पर्धा परीक्षेत सहभाग घेवून महाराष्ट्राचे नाव मोठ्या प्रमाणात देशात गाजवावे हाच ह्यामागील हेतू आहे.
ग्रामीण भागातील शाळेमध्ये उत्तम दर्जाचेच शिक्षक आहेत, मात्र शिक्षणासाठी पायाभूत सुविधांचा काही शाळांमध्ये बऱ्याच अंशी अभाव पाहायला मिळतो. ह्या अनुषंगाने रंग दे माझी शाळा हा उपक्रम राबविला जात आहे, असे महिला सचिव शिल्पा नायक ह्यांनी सांगितले.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील नादुरुस्त २४ शाळांपासून उपक्रमाची सुरुवात करण्यात येत असून पहिल्या टप्प्यात किमान ५०० शाळांना रंगरंगोटी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्र राज्याचे जल संपदा मंत्री श्री.जयंत पाटील ह्यांच्या हस्ते ह्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. ह्यावेळी जयंत पाटील यांनी सदर उपक्रमाला सहकार्य केल्याबद्दल सारस्वत बँकेचे कौतुक केले.
तसेच ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा आढळल्यास मिलिंद वेदपठाक, शिल्पा नायक,संकेत सातरडेकर, संतोष खांडेकर या व्यक्तींशी संपर्क साधावा, असे आवाहन आम्ही गिरगांवकर टीम तर्फे करण्यात आले आहे.
संपर्क
मिलिंद वेदपाठक :- ९८२०७९५५८०
शिल्पा नायक :- ९८३३४३०१९४
संकेत सातर्डेकर :-९८२०४८२५१६
संतोष खांडेकर :-९८३३७०९७८९