Type Here to Get Search Results !

नवघर स्टेशन पर्यायी रेल्वे रस्त्यासाठी धरणे धरण्याचा ग्रामस्थांचा निर्धार


नवघर स्टेशन पर्यायी रेल्वे रस्त्यासाठी धरणे धरण्याचा ग्रामस्थांचा निर्धार


 रायगड वेध विठ्ठल ममताबादे उरण


मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथील सिडकोच्या माध्यमातून नव्याने साकारण्यात येत असलेल्या नवघर रेल्वे स्टेशन काम जवळपास पुर्ण होत आले असून सातत्याने सिडको सोबत पत्रव्यवहार करून तसेच भेटीगाठी घेऊन देखील पर्यायी रस्त्याची दखल घेताना दिसत नाही या अगोदर दि.३१/०१/२०२० रोजी सिडकोचे वरिष्ठ अधिकारी पुजारी यांच्या दालनात नवघर ग्रामस्थांन सोबत झालेल्या बैठकीत दिलेली पर्यायी रस्त्याची लेखी हमी म्हणून पुन्हा सिडकोला आठवण देण्यासाठी दिनांक २५/०५/२०२२ रोजी सि.बी.डी.सिडको आ‌ॅफीस कोकण भवन येथे जाऊन निवेदन दिले त्याप्रमाणे सिडकोचे अधिकारी कांकरिया यांनी दि.२६/०५/२०२२ रोजी येऊन प्रत्यक्ष नवघर रेल्वे स्टेशनचे जेथे काम चालू आहे तेथे येऊन पाहणी केली असता येथील ग्रामस्तांची मागणी योग्य आहे मी तसा योग्यतो रिपोर्ट सिडको आणि रेल्वेला देतो असे सांगितले. यावेळी सुरेश तांडेल,रायगड भूषण प्रा.एल.बी.पाटील, जि.प.सदस्य विजय भोईर,उपसरपंच रवीशेठ वाजेकर,ग्रामस्थ मंडळ नवघरचे अध्यक्ष जयप्रकाश पाटील,शिवसेना शाखाप्रमुख अविनाश म्हात्रे,मोतीराम डाके उपस्थित होते. परंतू सातत्याने निवेदने,बैठका घेऊन देखील तसेच पावसाळा जवळ आला असता तोंडी आश्वासना पलीकडे कोणताही लेखी ठोस निर्णय देत नाहीत आणि प्रत्यक्ष सदर रस्ता रहदारी साठी मोकळा करत नाहीत म्हणून पुन्हा एक संधी म्हणून दिनांक ५ पर्यत जर निश्चित लेखी उत्तर सिडको तसेच रेल्वेच्या सक्षम अधिका-यां कडून दिला नाही आणि सदर रस्ता मोकळा केला नाहीत तर ५ जुन नंतर नवघर रेल्वे फाटका जवळ म्हणजे ६ जून २०२२ रोजी धरणे धरण्याचा निर्धार नवघर ग्रामस्थांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test