Type Here to Get Search Results !

तळा बसस्थानकातून म्हसळा व नालासोपारा एसटी सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त..


तळा बसस्थानकातून म्हसळा व नालासोपारा एसटी सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त..


रायगड वेध श्रीकांत नांदगावकर तळा


 तळा बसस्थानकातून म्हसळा व नालासोपारा एसटी सेवा सुरू झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तळा बसस्थानकातून सुरू असलेली म्हसळा व नालासोपारा एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बंद झाली होती. मात्र संप मिटल्यानंतरही या एसटी सुरू न करण्यात आल्याने प्रवाशांना ईतर खाजगी वाहनांनी प्रवास करावा लागत होता.यामध्ये अधिकचे पैसे खर्च होऊन नाहक त्रास देखील सहन करावा लागत होता.पूर्वी चालू असलेल्या नालासोपारा एसटीला प्रवाशांचा उत्तम प्रतिसाद मिळत होता.तसेच म्हसळा एसटीने पिटसई,मांदाड,कुडा रोवळा,वाशी आदि गावातील नागरिक प्रवास करीत असल्यामुळे येता जाता ही बस प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली असे. व या दोन्ही फेऱ्यांमधून एसटी महामंडळाला चांगला नफा देखील मिळत होता.काही महिन्यांपूर्वी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे तळा बसस्थानकातून या दोन्ही एसटीच्या फेऱ्या बंद झाल्या होत्या.एसटीचा संप मिटल्यानंतर तळा बसस्थानकातून बहुतांश एसटीच्या फेऱ्या पुन्हा सुरू झाल्या होत्या.मात्र नेहमी नफा मिळवून देणाऱ्या तळा ते म्हसळा व तळा ते नालासोपारा एसटी सुरू करण्यात आली नसल्याने प्रवासी वर्गामधून नाराजी व्यक्त करण्यात येत होती.याबाबत विविध वृत्तपत्रांमधून सदर बातमी झळकताच एसटी महामंडळाने याची दखल घेत शुक्रवार पासून तळा ते म्हसळा व तळा ते नालासोपारा एसटी बस सेवा पुन्हा सुरू केली.यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून या दोन्ही बस पुन्हा सुरू करण्यात आल्याने प्रवासी वर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

test
test
test