• संपामुळे ठप्प झालेल्या एसटीच्या प्रगतीला BSNL चा अडसर
● एसटीची प्रवासी सेवा रुळावर
रायगड वेध श्रीकांत बिरवाडकर म्हसळा
संपामुळे ठप्प झालेली एसटीची प्रवासी सेवा आता हळूहळू रुळावर येत आहे. रायगड विभागांत बहुतांश कर्मचारी कर्तव्यावर हजर झाले असून, गाव तिथे एसटी दिसायला लागली आहे. एसटीच्या प्रतीक्षेत असलेल्या गावा- गावातील नागरिकांनीही सेवेला चांगला प्रतिसाद दिला असून सध्या जिल्ह्यातील आठही डेपोंतून एसटीच्या बसेस पुन्हा धावू लागल्या आहेत. प्रवासी वाढल्याने जिल्ह्यातील एस.टी.चे उत्पन्नातही वाढ झाली आहे. पर्यायाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतून आर्थिक व्यवहारही प्रचंड वाढत असल्याचे चित्र आहे.
या सर्व प्रकाराना रायगड विभागांतील सर्व डेपो - स्टँड आणि प्रवाशी यांची Landline व्दारे असणारा संर्पक (conectiviti) नसल्याने प्रवाशाना योग्य सेवा देता येत नाही अशी तक्रार सर्व डेपो, स्टँड व प्रवासी संघटनांकडून होत आहे.
कनेक्टिंग पीपल असे ब्रीद वाक्य असलेल्या बीएसएनएलची सेवा रायगड विभागातील आलिबाग, पेण, कर्जत, श्रीवर्धन, महाड, माणगाव, रोहा, मुरुड या डेपोंतून आणि त्या अंर्तगत येणाऱ्या महाड, पोलादपूर, आंबेत, श्रीवर्धन, म्हसळा, बोर्ली, माणगाव, गोरेगांव, इंदापूर, तळा, मुरुड, रेवदंडा, अलिबाग, रेवस, पोयनाड, वडखळ, नागोठणे, पाली, पेण, रामवाडी, खोपोली, कर्जत या सर्व स्टँडमध्ये असणारे Bsnl चे Landline फोन बंद असल्याने प्रवाशांना पारदर्शक सेवा देत येत नाही अशी तक्रार एस.टी. डेपो व्यवस्थापनाची आणि प्रवासी व विविध प्रवासी संघटनांची आहे.
"Bsnl चे Landline फोन बंद असल्याने आमच्या सेवेत सातत्याने व्यत्यय येत असतो. आमचे स्थानिक अधिकारी संबधीत टेलीफोन एक्चेंजला आणि टेलीफोन विभागाचे मुख्य कार्यालयांत तक्रारी करूनही योग्य दखल घेतली जात नाही."
श्रीमती अनघा बारटक्के
विभागीय नियंत्रक, पेण- रायगड.
"दळण वळण क्षेत्रांत प्रचंड स्पर्धा, आणि तत्पर सेवा देणाऱ्या Bsnl व्यतीरिक्त Jio, Airtel आणि अन्य कंपन्या बाजारांत कार्यरत असतात त्यांच्या "कार्पोरेट स्कीम" खाली अनेक फायद्याच्या योजना असतात त्यांच्या सेवा रायगड परिवहन विभागाने घेणे आवश्यक आहे."
अनिल महामुनकर.
सचिव - एसटी प्रवासी संघटना, म्हसळा.